पिंपरी सांडस (तालुका हवेली) येथे काल सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टरच्या सहाय्याने ऊस बांधताना ट्रॅक्टर चालकावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, शेळी व कुत्र्याचा बळी,
बिबट्याची भीती सध्या पुण्याच्या ग्रामीण भागामध्ये सर्वत्र वाढत चालली असून कधी न दिसणारा बिबट्या आता भीमा नदीच्या हवेली तालुक्याचे पूर्व पट्ट्या दिसू लागला आहे, या भागामधील पिंपरी सांडस गावामध्ये हा बिबट्या रात्रीच्या वेळी शेळी व वस्ती मधील कुत्र्यांना आपले भक्षक बनवत असताना काल बुधवारी सायंकाळी 5:00 वाजता भरतवाडी मध्ये अमोल अशोक काळे आपल्या शेतामध्ये लहान चार चाकी ट्रॅक्टरने उसाची बांधणी करत असताना एक भला मोठा बिबट्या ट्रॅक्टरच्या पाठीमागे चालत आला, काळे यांनी बिबट्याला पाहिल्यानंतर ट्रॅक्टरला रिव्हर्स गिअर टाकत पाठीमागे घेतला परंतु ताकतवर बिबट्या बाजूच्या सरीतून समोर आला, हे दृश्य पाहता अमोल काळे घाबरले त्यांनी ट्रॅक्टरची ग्रीप फुल केली, त्या आवाजाने बिबट्या ट्रॅक्टरच्या भोवती गोल फिरू लागला, दरम्यान अमोल काळे यांनी वस्तीवर फोन करून माहिती दिल्यानंतर पंधरा-वीस जण घटनास्थळी दाखल झाले, सर्वांनी बिबट्या आवाज करत पळवून लावला, बिबट्या प्रत्यक्ष दर्शनी सर्वांनी पाहिला दैव बलबत्तर म्हणून अमोल काळे सुखरूप वाचले, या घटनेच्या आदल्या दिवशी या बिबट्याने एक शेळी व कुत्रे हल्ला करून मारले असून एक कुत्रे जखमी केले आहे,
या घटनेमुळे ग्रामस्थ भयभीत झाले असून संबंधित वन खात्याने पिंपरी सांडस भरतवाडी येथे बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी वारंवार होत आहे, ग्रामस्थांनी अनेकदा संपर्क साधून वन खात्याकडून मात्र दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये राग व रोष व्यक्त होत आहे, हवेली वन खात्याने याची ताबडतोब दखल घेत पिंजरा लावावा अशी मागणी होत आहे,