सुनील भंडारे पाटील
संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेले भारतीय इस्रो शास्त्रज्ञांचे प्रयत्नाला अखेर खूप मोठे यश मिळाले असून, आज सायंकाळी 6:05 मिनिटांनी चांद्रयान 3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग झाल्याने महाराष्ट्र राज्याच्या सर्वच भागात तसेच देशात सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात आला,
आपल्या भारत देशाच्या सुवर्ण क्षणामध्ये लिहिला जाणारा हा क्षण असून अमेरिका आणि इस्रो नंतर चंद्रावर पोहोचणारा आपला तिसरा देश आहे, तसेच चंद्रमावर दक्षिण ध्रुवावर अजून कोणच पोहोचले नव्हते म्हणजे दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा आपला पहिला देश आहे, सुमारे 615 कोटी खर्च असणारा या प्रोजेक्टसाठी गेल्या काही दिवसांपासून विक्रम लेंडरचे यशस्वी लँडिंग होण्यासाठी इस्रोचे शास्त्रज्ञ प्रयत्नशील होते, आपल्या देशाला मिळालेल्या या यशस्वी प्रयत्न मुळे जगभरात नाव उंचावले असून चंद्रयान तीनचे चंद्रमा वर लँडिंग यशस्वी होईल की नाही याकडे संपूर्ण जगातील देशांचे लक्ष लागले होते, परंतु इस्रोला आज या कामात यश मिळाल्याने जगभरात देशाची मान उंचावली असून, सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात आला,
चांद्रयान 3 च्या यशस्वी सॉफ्ट लँडिंग नंतर यापुढे 14 दिवस चंद्रमाच्या दक्षिण ध्रुवावर रोबोटिक ऑर्बिटर चंद्राच्या भूभागाची चाचणी फोटो, व्हिडिओ, तसेच इतर सर्व माहिती मिळणार असल्याने हा नवीन इतिहास रचला जाणार आहे, इस्रो शास्त्रज्ञांच्या या जागतिक रेकॉर्ड बद्दल सर्व स्तरातून कौतुक होत असून अनेक ठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष साजरा करण्यात आला,