सुनील भंडारे पाटील
कोरेगाव भीमा ते वढू बुद्रुक ( तालुका शिरूर) या रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम गेल्या काही दिवसांपासून रखडले असून ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे, संबंधित काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे,
अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज, धर्मवीर पीठ, शक्ती पीठ, प्रेरणापीठ, बलिदान पीठ तसेच राज्याची दुसरी पंढरी समजल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र वढु बुद्रुक या ऐतिहासिक वारसा असणाऱ्या गावाला जोडल्या जाणाऱ्या रस्त्याच्या अत्यंत महत्त्वाच्या कामाची सुरुवात राज्य शासनाने कोट्यावधिचा निधी देऊन केली होती, परंतु संबंधित ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे शिवाय जाब विचारणाऱ्या ग्रामस्थांना समाधानकारक उत्तर न दिल्याने तसेच उद्धट वर्तनाने ग्रामस्थांमध्ये तीव्र स्वरूपाची नाराजी आहे,
संबंधित रस्त्याचे काम चालू होऊन अनेक महिने लोटले, परंतु अनेक कामे प्रलंबित आहेत शिवाय झेड एफ कंपनी समोरील काम प्रलंबित असल्याने खराब रस्त्यामुळे ग्रामस्थांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे, राज्याबरोबर संपूर्ण हिंदुस्तानची अस्मिता असणाऱ्या संबंधित रस्त्याबाबत अशी अवस्था होणे दुर्दैवाची बाब आहे, अपूर्ण रस्त्याचे काम तसेच प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत अशी मागणी ग्रामस्थ व शंभू भक्त वारंवार करत आहेत,