खेड प्रतिनिधी
स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात किवळे (ता खेड) गावात ग्रामपंचायत येथे कोणशीला समारंभ पंचप्राण प्रतिज्ञा व निवृत्त सैनिक यांचा सत्कार समारोह संपन्न करण्यात आला, यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते,
विद्यालयात झेंडा वंदन उपाध्यक्ष माणिक कदम तसेच मुख्याध्यापक रामदास सांळुके यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले तसेच ग्रामपचयातीचा ध्वज सरपंच स्वाती कदम यांच्या हस्ते तर आरोग्य केंद्राचा माजी सैनिक माणिक म्हसे यांच्या हस्तेतर पशुवैद्यकिय दवाखान्याचा ध्वजारोहन सरपंच संतोष कड व तंटामुक्ती अध्यक्ष बाळासो सांळुके तर प्राथमिक शाळेचाध्वज विस्ताराधिकारी सुनंदा शेवकरी व शिष्यवृत्ती परीक्षे मध्ये आलेल्या प्रथम विद्यार्थीनीच्या हस्ते फडकविण्यात आला,