शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षम आमदार तसेच लोकांनी संबोधलेले कार्यसम्राट ही उपाधी देऊन कायम जनतेने आमदार अशोक बापू पवार यांचा उल्लेख केलेला आहे, आज 30 ऑगस्ट रोजी त्यांचा वाढदिवस शिरूर तसेच हवेली त्याचप्रमाणे आमदार पवार यांचे खंदे समर्थक, हितचिंतक, जिवलग, राजकीय बंधू मोठ्या उत्साहामध्ये वाढदिवस साजरा करत आहेत,
जीवनामध्ये अनेक प्रकारचे खडतर अडचणींना सामोरे जात पवार यांनी आपली राजकीय कारकीर्द मोठी उभी केली, त्यांच्यामुळे समाजातील अनेक घटकांना, तसेच राष्ट्रवादी पक्षाला मोठे पाठबळ मिळाले, घोडगंगा तसेच व्यंकटेश या दोन सहकारी क्षेत्रातील साखर कारखान्यांमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला,
त्यांना राजकीय वारसा तीर्थरूप वडील रावसाहेब दादा पवार यांचा लाभला असून समाजामध्ये विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अशोक पवार यांनी राजकारणामध्ये सुरुवातीपासूनच सक्रिय सहभाग घेतला होता, प्रथम ते शिरूर तालुक्या मध्ये पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आले होते, त्यानंतर लगेच घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकी नंतर अध्यक्षपदावर विराजमान झाले, जुन्या काळातील राजकारणामध्ये चाणक्य म्हणून समजले जाणारे शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे राजकारणात मोठे यश मिळवण्यामध्ये अशोक बापू पवार यांनी आपला ठसा उमटवला,
मतदारसंघांमध्ये विकास काम म्हटले की, आमदार अशोक बापू पवार अशी त्यांची ख्याती आहे, त्यांनी विज्ञान विभागाची पदवीधर म्हणून तसेच शेतीविषयक तंत्रज्ञान, त्याचप्रमाणे वकिलीची डिग्री, असे शिक्षण घेतलेले आहे, त्यांनी दोन वेळा शिरूर हवेलीचे आमदार म्हणून जनतेची सेवा केलेली आहे, त्यांनी समाजामधील कोणत्याही स्तराचे कार्य हाती घेतले तरी त्यामध्ये आधुनिकता,अभ्यास, आणि व्यवस्थापन करून ते कार्य पूर्णत्वास नेण्यास त्यांचा कायम प्रयत्न असतो, त्यांनी केलेल्या कामांमुळे राज्यभर त्यांची चर्चा आहे,
आमदार पवार यांनी आपल्या कार्यामध्ये तसेच कामांमध्ये दोन्ही तालुक्यांमध्ये रेशनिंग चे बायोटेक पद्धतीने वाटप केले, घरगुती व शेती तसेच उद्योग व्यवसायासाठी योग्य पद्धतीने वीज व्यवस्थापन केले, गोरगरिबांसाठी आरोग्य सेवा, गावोगावी शुद्ध पाण्याच्या पुरवठ्यासाठी जलशुद्धीकरण केंद्र उभारले, शासनाच्या निधीचे योग्य वापर करून विकास कामे मार्गी लावली, नागरिकांशी सुसंवाद साधण्यासाठी थेट संपर्क योजना राबवण्यात आली, ह्या सर्व कामांची रेलचेल पाहून शिरूर आणि हवेली तालुक्यातील नागरिकांनी व मतदारांनी मतदार संघाचे आमदार म्हणून अशोक बापू पवार यांची कायम पसंती जाहीर केली,
अशा या जनतेशी कायम संपर्कात असणाऱ्या, जनतेची अडीअडचण जाणून घेणाऱ्या विद्यमान आमदार अशोक बापू पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होत आहे, हे म्हणजे आमदार पवार यांच्या कामाची पोहोच पावती आहे, शांत मनमिळाऊ स्वभाव 24 तास जनतेच्या संपर्कात, नागरिक, पत्रकार असो वा लहान असो वा मोठा, केव्हाही - कधीही संपर्क करा अथवा फोन करा जनतेच्या सेवेत हजर असे देवाच्या रूपातील व्यक्तिमत्व जनतेला लाभलेले आहे,
संपादक भरारी न्यूज
उपाध्यक्ष राज्य मराठी पत्रकार परिषद पुणे जिल्हा
(विशेष लेख)