वढु खुर्द (तालुका हवेली) येथे कुबेर पार्क या भरवस्तीमधून काल शुक्रवार रात्री ८:३० वाजता भर मानवी वस्तीमध्ये लोकांच्या डोळ्यासमोर बिबट्याने हल्ला करून एका कुत्र्याची शिकार करून त्याला उचलून नेले, त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण तयार झाले आहे,
संबंधित गाव भीमा नदीच्या काठावर असून सभोवताली मोठ्या प्रमाणामध्ये उसाची शेती आहे, तसेच भीमा नदीचा काठ, ओढ्या नाल्यांमध्ये दाट झाडे झुडपे असल्याने हा भाग निसर्ग सौंदर्याने नटला आहे, पुणे नगर महामार्गाच्या बाजूने मोठ्या प्रमाणात रहदारी वाढत असून, कुबेर पार्क या लोक वस्तीत अनेक कुटुंबे वास्तव्यास आहेत, शेजारी पडीक जमिनीमधील झाडेझुडपे तसेच आजूबाजूला असणारे उसाचे क्षेत्र यामुळे बिबट्याला राहण्यासाठी अनुकूल परिस्थिती,
अशात काल रात्री उशिरा अंधारामध्ये पूर्व बाजूंच्या झाडाझुडपामधून एक बिबट्या लोक वस्तीत येऊन घराबाहेर गप्पा मारत बसलेल्या लोकांसमोर कुत्र्यावर हल्ला केला व त्याला पकडून तो पूर्व बाजूच्या झाडाझुडपात निघून गेला, ही घटना प्रत्यक्ष दर्शनी रहिवाशी सुरेश भंडारे, आकाश भंडारे, चंद्रकांत बुलबुले, किरण पाटील, मनोज पाटील यांनी पाहिली, त्यांनी सांगितले की हा बिबट्या मोठा व कमरे एवढ्या उंचीचा आहे, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले असून लोक वस्तीत लहान मुलेखेळत असतात, भविष्यात कुठली घटना घडू नये म्हणून हवेली वन खात्याने बिबट्या पकडण्यासाठी तातडीने पिंजरा लावावा अशी मागणी होत आहे,