लोणी काळभोर तसेच पूर्व हवेलीमध्ये दिवसेंदिवस अवैध धंदे वाढत चालले असून पोलीस प्रशासनाचा ढिला कारभार यानिमित्ताने उघडीस आला आहे .लोणी काळभोर पोलीस ठाण्याअंतर्गत येणारे उरुळी देवाची, कदमवाकवस्ती,कुंजीरवाडी, थेऊर ,सोरतापवाडी , तरडे लोणी काळभोर ,कुंजीरवाडी ,उरुळी कांचन यागावांमध्ये दिवसेंदिवस अनेक अवैध व्यवसायांना पेव फुटले आहे .
वेश्या व्यवसाय,मटके,दारूचे धंदे ,वाळु उपसा असे एक ना अनेक व्यवसायांच्या माध्यमातून गुन्हेगारवृत्तीला खतपाणी घातले जात असताना प्रशासन शांत का आहे .हे एक न उलगडणारे कोडे आहे.सर्वत्र सहज उपलब्ध होणारा गुटखा यामुळे अवैध व्यवसाय जोरात चालू असल्याचे दिसून येत आहे .कोण्यातरी एखाद्या दुकानाववर,लॉज वर कार्यावाही करायची मग त्याच जिवावर वाहवा मिळवायची हे किती दिवस चालणार आहे.जर खरेच कडक कार्यवाही केली असेल तर पुन्हा त्याच ठिकाणी तीच व्यक्ती कसा काय व्यवसाय चालू करण्याचे धाडस करतो यांच्यामागे नक्की कोणाचे आर्थिक हितसंबंध आहे याचा शोध घेणे गरजेचे आहे.
मटका ,गुटखा व दारु या व्यसनाच्या गर्द छायेत तरुणांना लोटण्यात जेवढे व्यावसायिक जबाबदार आहेत तेवढेच या व्यवसायांना आतल्या हाताने मदत करणारे प्रशासन देखील तेवढेच जबाबदार आहे.