आपल्या देशातील हरियाणा राज्यामध्ये मेवात शहरामधील नुह या ठिकाणी बजरंग दलाने काढलेल्या शोभा यात्रेवर मुस्लिम जिहाद्यांनी पूर्वनियोजित पद्धतीने हल्ला केल्यामुळे झालेल्या हिंसाचारात मोठे नुकसान झाले असून हिंदू धर्मातील लोकांच्या भावना दुखावल्या आहेत, या हिंसाचारात सहभागी असणाऱ्या मुस्लिम जीहाद्यांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे तीव्र स्वरूपात निषेध करण्यात आला,
बजरंग दलाच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या धार्मिक ब्रजमंडल यात्रेत इस्लामिक जिहादींनी हिंदूंच्या श्रद्धा आणि श्रद्धेचे केंद्र असलेल्या प्राचीन लहदान शिवमंदिराच्या यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंवर टेकड्यांवरून जोरदार दगडफेक, हिंसाचार, जाळपोळ आणि थेट गोळ्या झाडल्या. मेवातचे नूह, ज्यात शेकडो वाहनांचे नुकसान आणि जाळपोळ झाली आहे. दोन पोलीस होमगार्ड मरण पावले आहेत आणि यात्रेकरू आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते जखमी झाले आहेत, याच्या निषेधार्थ वाघोली (ता हवेली ) येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ या घटनेचा निषेध केला .
या प्रसंगी प्रमुख शिवाजीराव गोते , शांताराम कावरे , नरेंद्र पाटील, हनुमंत खांदवे , समीर झुरुंगे, मनोज ठाकूर , युवराज टकले, ऍड. शिवराज गरुड , राज जाधव, प्रतिक जाधव, चाली राजा तसेच मातृ शक्ती व दुर्गा वाहिनीच्या प्रमुख अनुराधा भोसले, भाग्यश्री सातव, व सर्व धर्मबंधु व मोठया संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.