वाघोली प्रतिनिधी सोमनाथ आव्हाळे
मुलीचा विनयभंग करून पत्नीला दांडक्याने जबरी मारहाण करत पायाने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना लोणीकंद परिसरातील आव्हाळवाडी येथे घडली. नराधम संदीप उत्तम मोरे वय 41 (रा माळवाडी आव्हाळवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे) असे आरोपीचे नाव असून त्याच्या विरुद्ध विरुद्ध लोणीकंद पोलिसांनी खून, विनयभंग तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात पीडित अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे,
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गंभीर गुन्ह्यातील आरोपी नराधम बापाने दोन दिवसापूर्वी स्वतःच्या अल्पवयीन मुलीचा दारू पिऊन विनयभंग केला. त्यामुळे पीडित मुलीच्या आईचे तिच्या वडीलांसोबत वादविवाद झाले होते. बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास नाराधम पित्याने पुन्हा आईसमोरच पीडित मुलीचा विनयभंग केला. त्याला तिने विरोध केल्यामुळे आरोपीने तिला लाकडी बांबूने बेदम मारहाण केली. पहाटे चार वाजेपर्यंत मारहाण करीत तिचे डोके भिंतीवर आपटून तिला जमिनीवर खाली पाडून गळ्यावर पाय दिला. एवढ्यावरच न थांबता घरातील दुचाकी मधील पेट्रोल काढून आई तुझ्या अंगावर तसेच गुप्तांगावर टाकून तुला जाळून मारतो अशी धमकी देत जबरी मारहाण करीत तिला जीवे ठार मारले. दुर्दैवाने उपचारापूर्वीच सदर महिलेचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी लोणीकंद पोलीस स्टेशनचे अधिकारी व आंमलदार यांनी तातडीने धाव घेतली. तसेच नराधम आरोपी पित्याला लागलीच ताब्यात घेतले. घटनास्थळी पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे, गुन्हे निरीक्षक मारुती पाटील, श्रीमती सीमा ढाकणे यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. नराधम आरोपी पित्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे करीत आहेत.