सुनील भंडारे पाटील
व्यवहारांमध्ये उत्कृष्ट दर्जाची सोई सुविधा तसेच पारदर्शकता मिळवण्यासाठी मोठी उलाढाल असणाऱ्या हवेली तालुक्याच्या पूर्वपट्ट्यातील पेरणे फाटा भागामध्ये राष्ट्रीयकृत तसेच आंतरराष्ट्रीयकृत बँका नसल्याने नागरिकांची अतिशय गैरसोय होत असून, बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक यासारख्या बँकांनी येथे शाखा खोलावी अशी मागणी नागरिक वारंवार करत आहेत,
मोठे शेती क्षेत्र, वाढती रहदारी, परिसरातील वाढते औद्योगीकरण यामुळे या भागामध्ये आर्थिक उलाढाल मोठी असून आता सध्या या भागात ऑनलाइन उलाढाल, व्यवहार करण्याकडे नागरिकांचा कल जास्त आहे, परंतु अर्थ खाते तसेच रिझर्व बँक ऑफ इंडिया चे या भागात दुर्लक्ष असून नागरिकांना आधुनिक सोयी सुविधा न मिळाल्याने खूपच गैरसोय होत असतानाची दिसत आहे तसेच इतर वित्त संस्थांकडून आधुनिक सोयी सुविधा मिळत नसल्याने अनेक अडी अडचणींना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे,
या भागामध्ये शेती क्षेत्र मोठे असून शेतकऱ्यांची बचत ठेवी, दीर्घ मुदतीच्या ठेवी, बचत खाते, चालू खाते, वेगवेगळी कर्ज प्रकरणे याची मोठी मागणी आहे, तसेच वाढत्या रहदारी मध्ये कामगार वर्ग, लहान मोठे व्यावसायिक, उद्योगपती यांची दाट वर्दळ असल्याने व्यवहारामध्ये नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते, बँकिंग क्षेत्रातील आकर्षक सोयी सुविधा मिळवण्यासाठी पुणे जिल्ह्यातील पूर्वपट्टीमधील पेरणे फाटा परिसरात रिझर्व बँक ऑफ इंडियाने लक्ष घालून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बँकांची शाखा व्हावी अशी मागणी नागरिक वारंवार करत आहेत,