कोरेगाव भीमा (तालुका शिरूर) येथील भीमा नदीवर सुमारे 115 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला ब्रिटिश कालीन ऐतिहासिक दगडी बांधकाम असणाऱ्या पुलाजवळ टोरेंट सीएनजी गॅस कंपनीच्या वतीने पुलाच्या पायथ्याच्या बांधकाम जवळून गॅस लाईन नदी क्रॉस करण्यासाठी मोठे ड्रिल मशीन लावण्यात आले असून ऐतिहासिक पुलाच्या बांधकामाला यापासून धोका आहे, एवढ्या भयान घटनेकडे मात्र पुरातत्व तसेच पीडब्ल्यूडी खात्याचे दुर्लक्ष झाले आहे,
संबंधित पूल कोरेगाव भीमा गावच्या वैभवात भर टाकत असून पुरातन दगडी बांधकाम, रेखीव तसेच कमानी लुक, आजही हा पूल आपल्या आयुष्याचे शतक पूर्ण करून तहाट मानेने उभा आहे, परंतु टोरेंट कंपनीचा मनमानी कारभारामुळे तसेच ठेकेदाराच्या आगाऊपणामुळे या पुलाच्या अस्तित्वाला गालबोट लागण्याची शक्यता आहे,
गेल्या आठवडे पासून पुलाच्या बांधकामाच्या कठड्याजवळून पूर्व बाजूच्या कोपऱ्यावरून मोठे ड्रिल मशीन नदीच्या पात्रात होल मारत असून हे ड्रिल नदीच्या खोलीतून आरपार ऐतिहासिक विजयस्तंभ (पेरणे) बाजूला निघणार असल्याकारणाने संबंधित पुलाच्या पायाजवळ दणकट असणारी जमीन भुसभुशीत झाल्याने या ऐतिहासिक ब्रिटिशकालीन पुलाला धोका होण्याची शक्यता आहे, दिवसाढवळ्या राजरोसपणे चालणाऱ्या या चुकीच्या कामाबद्दल मात्र स्थानिक लोक नेत्यांचे दुर्लक्ष झाले असून त्यांच्या अस्तित्वा विषयी लोकांच्या मनात प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे,
ऐतिहासिक ब्रिटिशकालीन पुलाजवळ चाललेली ड्रिल मशीन पहा व्हिडिओ
याबाबत संबंधित ठेकेदाराशी चर्चा केली असता आम्ही स्थानिक ग्रामपंचायत, पीडब्ल्यूडी सह सर्व खात्यांच्या परवानगी काढल्या आहेत, परंतु परवानगी मागितली असता ठेकेदाराकडून देण्यास टाळाटाळ होत आहे, एकंदरीत या कामावर मोठी शंका उपस्थित होत असून कोरेगाव भीमा गावच्या वैभवाची शान असणाऱ्या ऐतिहासिक ब्रिटिश कालीन पुलाला मात्र यापासून भविष्यात धोका आहे, गुपचूप चाललेले या कामाबद्दल बऱ्याचशा ग्रामस्थांना माहिती पण नाही, संबंधित पुलाला यापासून धोका होऊ नये म्हणून हे काम त्वरित थांबवावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे,