सुनील भंडारे पाटील
लोणीकंद (तालुका हवेली) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये उबाळे नगर वाघोली येथील स्पाइस हॉटेलच्या पाठीमागे पुणे नगर रोडच्या बाजूला एक संशयास्पद मारुती व्हॅगनार गाडी उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्या ठिकाणी सापळा रचून संबंधित आरोपी ताब्यात घेतला असून योगेश उर्फ नरेंद्र दिलीप नवघरे असे दरोडा टाकणाऱ्या टोळीतील आरोपीचे नाव आहे,
याबाबत लोणीकंद पोलीस स्टेशनला दिलेल्या माहितीनुसार संबंधित उभी असलेल्या संशयास्पद गाडीच्या ठिकाणीची माहिती तातडीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे व तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे यांना देण्यात आली, त्यानुसार तपास पथकाचे पोलीस नाईक स्वप्निल जाधव, पोलीस शिपाई अमोल ढोणे, शुभम चिनके, मल्हारी सपुरे,यांनी तातडीने संशयित गाडीच्या ठिकाणी सापळा लावून संबंधित कार जवळ एक संशयित व्यक्ती कार घेण्यासाठी येता त्यास त्याच्या मोटरसायकलीसह ताब्यात घेऊन लोणीकंद पोलीस स्टेशनला आणले, तसेच त्याचे कौशल्य पूर्ण चौकशी करण्यात आली, त्यांनी त्याचे नाव योगेश उर्फ नरेंद्र दीलीप नवगरे राहणार कात्रज पुणे, यांनी दिनांक 14 /9/2023 रोजी येरवडा पुणे पोलीस स्टेशन हद्दीत इतर तीन साथीदारांसह सीमा घाट ब्रिज खाली येरवडा पुणे येथे इतर तीन साथीदारांच्या साह्याने एका व्यक्तीवर धारदार शास्त्राने गंभीर मारहाण करून त्याच्याकडून 90 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले, याबाबत येरवडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे, तातडीने आरोपीची अंगझडती घेतली असता त्यापैकी पाच हजार रुपये मिळून आले, तसेच संशयित मोटार कार पंचनामे अंतर्गत ताब्यात घेऊन मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी येरवडा पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आली आहे,
सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त रंजन शर्मा, पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे मारुती पाटील, पोलीस निरीक्षक श्रीमती सीमा ढाकणे, पुणे शहर तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे, पोलीस उपनिरीक्षक प्रियंका पवार, पोलीस नाईक स्वप्निल जाधव, पोलीस शिपाई अमोल ढोणे, शुभम चिनके, मल्हारी सपुरे यांनी केली,