सुनील भंडारे पाटील
कर्ज घेण्याच्या उत्सुकतेमध्ये कर्जदाराकडून विचार केला जात नाही, खुल्या मार्केटमध्ये अनेक वित्त संस्था कर्ज देण्यासाठी बसलेले आहेत परंतु कर्ज घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या व्यक्तीकडून चुकीची वित्त संस्था निवडली गेली, तसेच कर्जाची फेड वेळेत नाही झाली तर मात्र त्याची स्थावर मिळकत मातीमोल किमतीमध्ये जप्त होऊ शकते, कर्ज घेण्यासाठी राष्ट्रीयकृत बँका हा एक चांगला पर्याय आहे,
सद्यस्थितीत प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती कोरोना लॉकडाऊन कालावधीपासून गंभीर असून लोकांना जीवन जगणे देखील मुश्किल झाली आहे, जीवन जगण्याच्या धडपडीमध्ये कुठून तरी कर्ज मिळते का नाही यासाठी सर्वसामान्य गरीब माणसाचा प्रयत्न चालू आहे, गेल्या चार वर्षाच्या कालावधीमध्ये लोकांची आर्थिक परिस्थिती ढासळली असून जीवनच जगता न येणाऱ्या माणसाने बँकांचे हप्ते कसे फेडायचे त्यात व्याजाव व्याज, थकबाकी व्याजावर व्याज, तुमची प्रॉपर्टी तारण असो वा नसो ऑनलाइन पद्धतीने तुमच्या नावावरील स्थावर मिळकतचे पेपर काढून 101 ची केस दाखल करण्यात येते, मॅनेज पद्धतीने स्थावर मिळकतीवर बोजा चढून त्या प्रॉपर्टीचा जप्ती व डायरेक्ट निलाव केला जातो, याची खबर कर्जदाराला कानोकान लागत नाही, कर्जदाराने अनेक महिने स्थावर मिळकतीचा उतारा पाहिला नाही आणि खूप दिवसांनी उतारा पाहिला तर तो उतारा दुसऱ्याच्या नावाने निघतो किंवा त्यावर जप्तीच्या आदेश टाकलेला दिसतो, अशी अनेक उदाहरणे समाजात घडली आहेत,
कर्ज घेतल्यानंतर भविष्यात त्या कर्जदाराची परिस्थिती कशी असेल, घरामध्ये एखादा मोठा हॉस्पिटलचा खर्च येतो,एखाद्या व्यक्तीचा अपघात होतो, किंवा त्या कर्जदाराची समाजात मोठी आर्थिक फसवणूक होते त्यामुळे त्याला वेळेत कर्जाचे हप्ते भरता येत नाहीत, कर्ज घेण्यासाठी जर चुकीची वित्त संस्था निवडली तर त्यांना थकबाकी अजिबात चालत नाही, मग व्याजावर व्याज, थकबाकी व्याजावर व्याज असा सर्व हिशोब करून त्या कर्जदाराला वसुलीसाठी दादागिरी, घरी चकरा मारून, नातेवाईकांना त्रास देऊन वसुलीचा तगादा लावला जातो, कर्जदाराची कर्ज फेडण्याची तयारी असते परंतु या सर्व प्रक्रियेमुळे तो कर्जदार मानसिक ताण तणावात जातो, मग नंतर त्याला एक तर कर्ज मिटवणे, किंवा आत्महत्या करणे हा पर्याय उरतो,
कर्ज घेण्यासाठी कर्जदाराने जर चुकीची वित्त संस्था निवडली आणि कर्ज भरले गेले नाही, तर मात्र त्याची प्रॉपर्टी जप्त करून मातीमोल किमतीत विकली जाणार हे निश्चित आहे, त्यामुळे कर्ज घेताना लोकांनी चाणक्ष राहणे गरजेचे आहे,