आळंदी प्रतिनिधी आरीफभाई शेख
आळंदी देवाची येथील छत्रपती शिवाजी महाराज मार्ग जवळ मोठ्या संख्येने जालन्यातील अमानुष लाठी आल्याच्या घटनेचे निषेधार्थ मराठा समाज एकत्र येत आक्रमक झाला. जालन्यातील अंतरवाली सराटी या ठिकाणी शांतते च्या मार्गाने मराठा आरक्षणासाठी चालू असलेल्या आंदोलनावर पोलिसांनी अमानुष लाठी हल्ला केला या घटनेचे पडतात महाराष्ट्रभर उठत आहेत,
आळंदी शहरातील मराठा समाज आक्रमक होत मोठ्या प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी जमा होत राज्य सरकारच्या निषेधार्थ एक वाटलेला दिसून आला यावेळी आपल्या मनोगतामध्ये मराठा समाजावर केलेल्या लाठी आल्याची मोठ्या प्रमाणात चीड कार्यकर्त्यांमध्ये दिसून आली राज्य सरकारच्या निषेधार्थ ही घोषणा देण्यात आल्या, आणखीन आक्रमकतेने आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला यावेळी आळंदी नगर परिषदेचे शिवसेना माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर आळंदी नगरपरिषद माजी विरोधी पक्षनेते डी डी भोसले पाटिल..पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस चे उपाध्यक्ष व माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे. शिवसेना नेते उत्तम दादा गोगावले. मंगेश किताडे शशि राजे जाधव रमेश गोगावले. आळंदीकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्य सरकारच्या निषेधार्थ घोषणा देत. सडेतोड उत्तर देऊ असेही वरील मान्यवरांनी मनोगत मध्ये सांगितले. येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात दंगली घडवण्याचा कट असून मराठा समाजाने कुठल्याही चितावणीला बळी पडू नये असे शिवसेना नेते उत्तम दादा गोगावले यांनी सांगितले,
प्रकाश कुराडे पाटील यांनी या निषेधार्य घटनेबाबत तीव्र पडसाद उमटलेत त्याचे समर्थन केले तसेच डीडी भोसले पाटील यांनी आपले मनोगरतामध्ये मराठा समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्यास एकजुटीने लढा दिला जाईल असे मत मांडले. दरम्यान " एक मराठा लाख मराठा" या घोषणाने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसर दनाणून सोडला शिंदे फडणवीस सरकारचा निषेध करत पोलिसांचा दोष नाही तर पोलिसांना कारवाई करण्यात भाग पाडले ते भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या छत्रपती शिवराया छत्रपती संभाजी राजे यांचा जयजयकार करत . आक्रमक झालेला मराठा समाज आळंदी मध्ये एकवटल्याचे दिसून आले.