आळंदी प्रतिनिधि आरीफभाई शेख
महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात पावसाने मान्सून आगमन ठरल्या प्रमाणे हजेरी लावली. मात्र सरासरी पेक्षा प्रमाणात कमीच
पाऊस झाला.ऑगस्ट महिना कोरडा पावसाविना गेला. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे सप्टेंबर मध्ये सरासरी प्रमाणे पाऊस होईल त्याची सुरुवात आळंदी मध्ये झाली पहाटे जोरदार पावसाच्या सरी पडल्या सुमारे चार दिवसापासून आळंदीकर उकाड्याने हैराण झाले होते असह्य गर्मीने त्रास होत होता. त्यातच विजेचा लपंडावही चालू होता. आज सकाळपासूनच आळंदीत पावसाने जोरदार बॅटिंग करत आळंदी परिसर न्हाऊन निघाला त्यामुळे आळंदीत गारवा निर्माण झाला. सकाळी पहाटे आळंदीत मोठ्या पावसाला सुरुवात झाली त्यानंतर आळंदीत दुपारपर्यंत पावसाची सतत धार चालू होती. खूप दिवसाच्या उघडीपणे पडलेले या पावसाने आळंदी नागरिक सुखावले उष्णतेने लाहीलाही होणारे आळंदीकरांना त्यामुळे दिलासा मिळाला आणि वातावरणात गारवा निर्माण झाला,