* कोरेगाव भीमा येथील वढू चौक रस्त्याच्या बाजूला साठले पावसाच्या पाण्याचे डबके
* एकाच जागी पाणी साठल्याने साथीचे आजार पसरण्याची भीती
* विद्यार्थी,महिला भगिनी,कामगार वर्ग,व्यापारी व नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास
कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथील मुख्य वढू चौकातील रस्त्याच्या बाजूला जीवन हॉस्पिटल, मोरया हॉस्पिटल,श्रीराम मेडिकल, श्रीकृष्ण मेडिकल, जीवन मेडिकल, वैष्णवी सुपर मार्केट अशा मुख्य रहदारीच्या ठिकाणी पावसाचे पाणी साठल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
या रस्त्यावरून विद्यार्थी,महिला भगिनी,कामगार वर्ग,व्यापारी व नागरिक यांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असून नागरिकांना प्रवास करताना खराब पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. पावसाचे पाणी साठल्याने साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. कोरेगाव भीमा गावामध्ये ग्रामपंचायतीचे लोकांच्या मूलभूत प्रश्नांकडे कायमच दुर्लक्ष असते,
कोट्यावधी रुपयांचे ग्रामपंचायतीला उत्पन्न असताना गावामधील ग्रामस्थांना कायम अडचणींना तोंड द्यावे लागते, संबंधित ठिकाणी आजूबाजूला हॉस्पिटल तसेच मोठी रहदारी आहे, अशा ठिकाणी पाण्याची डबकी साचणे म्हणजे आजारांना निमंत्रण याबाबत स्थानिक प्रशासनाने तातडीने लक्ष घालून पावसाचे पाणी साठू नये यासाठी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.