सुनील भंडारे पाटील
बकोरी (तालुका हवेली) येथील देवराई वनराई प्रकल्पात रोजच वेगवेगळ्या प्रकारची औचित्य साधून वृक्षरोपण केले जाते त्यामध्ये वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, घरातील नातेवाईकांचे स्मरणार्थ अशाप्रकारे वृक्षरोपण केले जाते परंतु आज प्रथमच मुलगा झाला म्हणून पेढे न वाटता वृक्षरोपण करुण आनंद ऊस्तव साजरा करण्यात आला.
वाघोली येथील तरुण वृक्षमित्र कमलेश बहीरट यांना नुकतेच पुत्र रत्न प्राप्त झाले त्यांनी मुलगा झाल्याचे स्वागत करण्यासाठी वृक्षरोपण करण्याचे ठरवले व आज बकोरी देवराई वनराई प्रकल्पात १११ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले त्याठीकानी वड,पिंपळ,करंज, चिंच,कडुलिंब, फणस,पांगारा, बेल अशाप्रकारची देशी झाडे लावण्यात आली .वृक्षरोपण कार्यक्रमासाठी वृक्षमित्र संदीप डफळ,योगेश सातव सर ,कमलेश बहीरट, चंद्रकांत वारघडे हे उपस्थित होते. मुलाच्या जन्माचे स्वागत वृक्षारोपण करून अशी नवीन प्रेरणा बहिरट्यांनी समाजाला दिली आहे,प्रत्येकाने आपल्या आंनंदाचे क्षणी वृक्षरोपण करुण आनंद साजरा करावा असे आव्हान वृक्षमित्र चंद्रकांत वारघडे यांनी केले.