कोरेगाव भीमा ग्रामपंचायतचे सीसीटीव्ही कॅमेरे गेले कुठे, का बसवलेच नाहीत ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचे वातावरण

Bharari News
0
सुनील भंडारे पाटील
              कोरेगाव भीमा (तालुका शिरूर) ग्रामपंचायतीने भीमा नदी पूलालगतच्या पुणे नगर महामार्गाच्या बाजूला सतत कचरा टाकणाऱ्या वर करडी नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही बसवले आहेत अशा सूचनेचा एक फलक आहे, परंतु त्या ठिकाणी सद्यस्थितीत कॅमेरेच नाहीत, मग या ठिकाणचे कॅमेरे गेले कुठे, का बसवलेच नाहीत याविषयीची चर्चा ग्रामस्थांमध्ये चालू आहे,
                संबंधित ठिकाणी भीमा नदीवर ब्रिटिश कालीन अतिशय आकर्षक असे चिरेबंदी दगडी बांधकाम केलेला ब्रिटिश कालीन पूल स्थित आहे, शिवाय या पुलाला सर सेनापती हंबीरराव मोहिते असे ऐतिहासिक नाव दिले आहे परंतु या पुलाच्या पूर्व बाजूला कोरेगाव भीमा ग्रामपंचायत हद्दीत पुणे नगर महामार्ग लगत कायम कचऱ्याचे ढीग साचलेले असतात, आजूबाजूला दाट लोकवस्ती तसेच कोरेगाव भीमा मुख्य गावठाण असल्याने संबंधित कचऱ्याने परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे, वेगवेगळ्या साथीच्या आजाराची शक्यता आहे, महामार्गावरून जाणारे शिरूर हवेलीतील प्रवासी तसेच परिसरातील व्यावसायिक कचरा टाकत असल्याने येथे कायम कचऱ्याचा खच दिसत आहे, 
               ग्रामपंचायतच्या वतीने कचरा कचरा टाकणाऱ्यांना पकडण्यासाठी तसेच चाप बसण्यासाठी आपण सीसीटीव्ही च्या कक्षेत आहात असा बोर्ड लावला आहे, परंतु प्रत्यक्ष ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेच नाहीत, की या ठिकाणी कॅमेरे बसवले नाहीत, केवळ लोकांची दिशाभूल केली जाते का? असे गंभीर स्वरूपाचे प्रश्न उपस्थित होत असून, ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे,
कोरेगाव भीमा ग्रामपंचायतचे सरपंच विक्रम गव्हाणे पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की कॅमेरा बसवण्याचे टेंडर देण्यात येणार आहे, लवकरात लवकर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेऊ,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!