श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये विद्यार्थ्यांसाठी टेक्नोसॉफ्टचे आयोजन

Bharari News
0
सुनील भंडारे पाटील
         श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग  लोणीकंद पुणे, येथे नुकतेच इंजिनीअरिंग  अभ्रासक्रमाच्या अंतिम वर्षांमध्ये शिकत असणाऱ्या  विद्यार्थ्यांसाठी टेक्नोसॉफ्ट या बहुउपयोगी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग  व  अनुदीप फाउंडेशन यांच्यामध्ये झालेल्या शैक्षणिक  सामंजस करारानुसार  (MOU)  हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
    श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग  यांच्या वतीने वेळोवेळी अशा विद्यार्थी उपयोगी प्रशिक्षण कार्यक्रमाचे  आयोजन केले जाते.  अशाच प्रकारचा कार्यक्रम महाविद्यालयाच्या लोणीकंद येथील शिक्षण संकुलामध्ये आयोजित करण्यात आला होता . यावेळी TIAA  या आंतरराष्ट्रीय अमेरिकन कंपनीतील ग्लोबल हेड प्रमुख उपस्थित होते.  या वेळी विद्यार्थ्यांसाठी  चर्चासत्रही  आयोजित केले होते. त्यामध्ये AI , Chat GPT , Agil Methedology, Software Reliability, Technology Career , Career read lines & Self-Leadership  या  महत्वपूर्ण विषयावर विध्यार्थ्यांना  बहुमूल्य मार्गदर्शन केले गेले .   बदलत्या जागतिक परिस्थितीनुसार विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देण्यासाठी सदर प्रशिक्षण कार्यक्रम विध्यार्थ्यांसाठी महत्वाचा  आहे.  TIAA  आणि अनुदीप फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने Full stack Java Development with anguler  हा 450 तासांचा प्रशिक्षण कार्यक्रमांत इंजिनीअरिंग  अभ्रासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या विध्यार्थ्यांसाठी  महाविद्यालयामध्ये विनामूल्य चालू आहे.  
     या कार्यक्रम प्रसंगी बोलताना श्री रामचंद्र शिक्षण संस्थेचे  संस्थापक अध्यक्ष श्री मारुतीबापु  भूमकर  यांनी अमेरिकेतील TIAA  या मल्टिनॅशनल कंपनीच्या अधिकाऱ्यांचे स्वागत केले.  त्याचप्रमाणे बदलत्या आधुनिक युगामध्ये विद्यार्थ्यांना अशा तांत्रिक शिक्षणाची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.  व आजच्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना त्याचा निश्चित फायदा होण्याबाबत त्यांनी विश्वास व्यक्त  केला.तसेच प्राचार्य अविनाश देसाई यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बदलत्या परिस्थितीमध्ये टिकून राहण्यासाठी उत्कृष्ट  मार्गदर्शन केले.  याचबरोबर महाविद्यालयातील  सर्व विभाग प्रमुखांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  या कार्यक्रमाचे आयोजन श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा प्लेसमेन्ट विभाग,  प्राध्यापक रोहित पिंगळे व कॉम्पुटर विभागप्रमुख प्रा . बाबासाहेब शिंदे तसेच त्यांचे सहकारी यांनी केले होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!