खेड प्रतिनिधी
खेड तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे सचिव व खेड ता. शिक्षक शिक्षकेत्तर पतसंस्थेचे मा. अध्यक्ष लतिफ शेख यांना जन आरोग्य परिवार आयोजित जाणीव फांऊडेशन संगमनेर यांच्या वतीनेदिला जाणारा लोकनेते बाळासाहेब थोरात आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार जाहीर झाला असून 3 सप्टेंबर 2023 रोजी या पुरस्काराचे वितरण संगमनेर येथे होणार आहे, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात शेख यांचे कार्य अतुलणीय आहे संघटनेच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रात त्याचे कार्य चालू आहे पंतजली योग समितीच्या माध्यमातून विविध विद्यालय व कॉलेज येथे योग व प्राणायाम तसेच १०वी नंतर पुढे काय करिअर मार्गदर्शन या विषयावर व्याख्यान देण्याचे कार्य चालू आहे तसेच जनलोक वार्ता खेड आवृत्तीचे संपादक म्हणून शैक्षणिक सामाजिक प्रश्न मांडून लेखन कार्य चालू आहे विविध प्रशालेत हिंदी विषयाचे मार्गदर्शन त्यांनी दिले आहे आतापर्यत त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील चार वेळा मैदानी स्पर्धेत पंच म्हणून निवड व जिम्नॅस्टिक राष्ट्रीय स्पर्धा व स्विमिंग राष्ट्रीय स्पर्धा व मिनी ऑलंपिक स्पर्धा महाराष्ट्र येथे पंचकार्य केले आहे राज्यस्तर विभाग स्तरावर व तालुका स्तरावर हिंदी व शारीरिक शिक्षण या विषयाचे मास्टर ट्रेनर म्हणून कार्य केले आहे. विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे शेख श्री भैरवनाथ विद्यालय किवळे येथे हिंदी व आरोग्य व शारीरिक शिक्षक म्हणून काम करतात त्यांच्या या उल्लेखनिय कार्याची दखल घेवून त्यांना या वर्षाचा पुरस्कार दिला जाणार आहे असे आयोजकांनी जाहिर केले आहे तसे पुरस्कार पत्र विद्यालयात प्राप्त झाले आहे यामुळे तालुक्यातील व जिल्हयातील सर्व शिंक्षकानी सामाजिक संघटनानी शेख यांचे कौतुक आणि शुभेच्छा दिल्या शेख यांनी हा पुरस्कार स्पूर्ती देणारा असून त्यांचा मी सम्मान करीत आहे तसेच माझ्या बरोबर काम करणारे सर्व संघटना प्रतिनिधी माझे सर्व सहकारी मित्र संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब कदम जनलोक वार्तापत्राचे राष्ट्रीय अध्यक्ष राजू शिंगाडे मुख्याध्यापक रामदास साळुंके व माझे सर्व सहकारी शिक्षक व माझे आई वडील यांना हा पुरस्कार समर्पीत करत आहे. शेख यांनी आयोजकाचे मनापासून आभार मानले.