सुनील भंडारे पाटील
येरवडा येथे मेट्रो स्टेशनच्या जिना व पिलर हे चुकीच्या पद्धतीने बांधण्यात येत होते याचे वेळोवेळी प्रशासनास सूचना देऊन सुद्धा प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही म्हणून नगरसेवक अँड.अविनाशदादा साळवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले, यावेळी नगरसेवक अँड अविनाश दादा साळवे म्हणाले की हा राष्ट्रीय महामार्ग आहे नियमानुसार मेट्रो ने हे बांधकाम 23 मीटर च्या पुढे करणे आवश्यक होते परंतु त्यांनी तसं न करता हे रस्त्यावरच घेतले आहे त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास होतं आहे त्यामुळे ह्या बांधकाम बाबत ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत मेट्रो स्टेशनचे बांधकाम होऊन देणार नाही. यावेळी हिंदू युवा क्रांती संघटनेचे सचिव अनिल जमदाडे उपस्थित होते व ते म्हणाले की गेले कित्येक वर्षापासून या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे याकडे प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे नाही तर पुढील काळात नगरसेवक अँड.अविनाशदादा साळवे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र असे आंदोलन उभे करण्यात येईल याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते डॅनियल लांडगे अक्षय साळवे संजय धायगुडे गिरीश मोहिते मुक्तियार शेख असे अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते,