पुणे नगर महामार्गालगत लोणीकंद (तालुका हवेली) येथे टोरेंट कंपनीच्या वतीने ड्रिल मशीनच्या सहाय्याने खोदकाम चालू आहे, परिणामतः महामार्ग लगत मोठे खड्डे तयार झाले असून रस्त्यावर माती आल्याने अपघाताची दाट शक्यता तयार झाली आहे,
संबंधित महामार्गावर राज्याच्या पूर्व भागात जोडलेली शहरे तसेच वाघोली, लोणीकंद, कोरेगाव भीमा, सणसवाडी, रांजणगाव गणपती, या ठिकाणचे औद्योगीकरण, आसपासचे मोठे बागायती क्षेत्र, तसेच मोठी रहदारी यामुळे संबंधित महामार्गावर दाट वाहतूक आहे तसेच वाहनांचा अतिवेग यामुळे टोरेंट कंपनीच्या कामामुळे रस्त्यालगत तयार झालेल्या मोठे खड्डे तसेच रस्त्यावरील मातीमुळे लहान-मोठे अपघाताची शक्यता आहे,
लोणीकंद मधील आपल्या घर सोसायटीच्या समोर चाललेल्या कामामुळे रस्त्याला एकदम खेटून कमरे एवढ्या मापाचे खड्डे तयार झालेली आहेत, शिवाय बऱ्याच ठिकाणी खोदकामाची माती महामार्गावर विखरून पडली आहे, ऐन पावसाळ्यात चाललेले या कामामुळे मातीमुळे चिखल तयार होऊन रस्त्याला घसरडेपणा येत आहे, दिवसा ढवळे चाललेले या अंदा धुंद कारभाराकडे कोणाचेच लक्ष नाही, एखादा मोठा अपघात झाले तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे,
सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे नगर रस्त्याचे अधिकारी राहुल कदम यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही,