पुणे नगर महामार्ग लगत पुणे शहराकडून अहिल्या नगर कडे चाललेले टोरेंट गॅस पाईपलाईन चे काम या संदर्भात आम्ही भरारी न्यूज प्रसिद्धी माध्यमातुन गेले बरेच दिवस वृत्तांकन करून बऱ्याचशा गोष्टी समाजातील तळागाळातील व्यक्तींना माहिती करून दिल्या , जनजागृती झाल्यानंतर वेगवेगळ्या तक्रारी गेल्याने अखेर भरारी न्यूजच्या दणक्याने संबंधित काम बंद करण्यास भाग पाडले,
गेले महिन्यापासून पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा तसेच लोणीकंद या भागामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हाधिकारी पुणे यांच्या परवानगी मधील बरेचसे नियम पायदळी तुडवून संबंधित ठेकारांकडून राजकीय पाठबळाच्या जोरावर प्रयत्नांची बाजी लावत काम चालू ठेवले होते, परंतु गेले अनेक दिवस भरारी न्यूज माध्यमा मधून बऱ्याचशा गोष्टी उघड झाल्याने अखेर टोरंटो गॅस कंपनीला झुकावे लागले गेल्या पाच दिवसांपूर्वी हे काम बंद झाले,
कोरेगाव भीमा येथे असणारे ऐतिहासिक ब्रिटिशकालीन वास्तू दगडी बांधकामातील कमानी पूल, तसेच देशाची अस्मिता असणारा जयस्तंभ या वास्तुंना धोका असल्याचे तक्रारी दाखल झाल्या होत्या, त्याचबरोबर लोणीकंद येथील ठेकेदाराकडून कोट्यावधी रुपये खर्चून केलेला महामार्ग लगत मोठमोठे खड्डे, त्याचप्रमाणे रस्त्यावर टाकण्यात आलेली माती याचा नाहकत्रास प्रवाशांना तसेच नागरिकांना सहन करावा लागत होता, संबंधित काम बंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला असून सर्वांनी भरारी न्यूजचे आभार मानले,