लोणीकंद मधील कु.ज्ञानेश्वरी कंद अवघ्या कमी वयात कळसुबाई शिखर सर करणारी महाराष्ट्रातील पहिली कन्या

Bharari News
0
हवेली प्रतिनिधी 
      लोणीकंद (ता. हवेली) गावातील गिर्यारोहक स्वप्निल कंद यांची कन्या ज्ञानेश्वरीच्या हीने आंतरराष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधून सह्याद्री पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई १६४६ मीटर उंचीचे शिखर सायकल सोबत घेऊन पुर्ण करून विक्रम केला.
अगदी कमी वयातील मोठा संघर्ष करून, संकटांशी सामना करत कळसुबाई शिखर सर  करण्यासाचा विक्रम करणारी, यशस्वी होण्यासाठी जिद्द व चिकाटीने  ज्ञानेश्वरी पहिली महाराष्ट्रातील कन्या आहे. ज्ञानेश्वरीच्या या कामगिरी बद्दलअनेक स्तरावरून अभिनंदन व कौतुक करण्यात आहे.
कु.ज्ञानेश्वरी स्वप्निल कंद
वय ११वर्ष इयत्ता ५ वी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
लोणीकंद 
वयाच्या पाचव्या वर्षापासून किल्ले पाहण्याची आवड. आजपर्यंत एकूण ३९ किल्ल्यांवरती भेट आहे.त्यात प्रामुख्याने लिंगाणा, तैल बैला यासारखे किल्ल्यांवरती आरोहण देखील केले आहे.
       सिंहगड ते रायगड पायी मोहीम-
सिंहगड वरून राजगड तोरणा लिंगाणा व रायगड अशी साडेतीन दिवसात १२६ किलोमीटर मोहीम करणारी ती महाराष्ट्रातील सर्वात लहान वयाची आहे.
त्याचप्रमाणें पन्हाळा ते पावनखिंड ही धारातीर्थ मोहिम देखील यशस्वीरित्या पार केले आहे.भविष्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे संपुर्ण गडकिल्ले व ऐतिहासिक घाटवाटा या ठिकाणी भेट देण्याचे आहे.
त्याच प्रमाणे भविष्यात माउंट एवरेस्ट सर करण्या साठी तिचे प्रयत्न चालु आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!