सणसवाडी येथे मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सवाचे आयोजन

Bharari News
0
सणसवाडी येथे मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सवाचे आयोजन

सांस्कृतिक,धार्मिक, खेळ पैठणीचा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करत महिलांच्या व भाविकांचे रेड कार्पेटवर स्वागत तर महिलांच्या सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे व स्वयंसेवक
 
सुनील भंडारे पाटील 
        सणसवाडी (ता. शिरूर) येथील मयुरनगर आयोजीत दुर्गामाता नवरात्रोत्सव मंडळाच्या कार्यक्रमांची विविध समाजोपयोगी उपक्रमांनी व सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात येणार असून यावेळी विविध सांस्कृतिक, धार्मिक, मनोरंजन व खेळ पैठणीचा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंडळाचे संस्थापक व पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य  पंडित आप्पा दरेकर व मनसे पुणे जिल्हाध्यक्ष व मंडळाचे आधारस्तंभ रामदास दरेकर यांनी दिली.
  
       दुर्गामातेची मुर्तिस्थापना व घटस्थापना माजी पंचायत समिती सदस्या सविता दरेकर, माजी सरपंच सुनंदा नवनाथ दरेकर, सणसवाडी ग्राम पंचायतीच्या माजी सदस्य सुनीता उत्तम दरेकर, ग्राम पंचायत सदस्या  ललिता बाळकृष्ण दरेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
    नवरात्रोत्सवात सोनुचा नदा नाय करायचा, प्रती इंदुरिकर महाराज कॉमेडी कीर्तन विनोद महाराज रोकडे,शाब्बास होम मिनिस्टर हा खेळ पैठणीचा हा कार्यक्रम राजेंद्र टाक सादर करणार असून यावेळी महिला भगिनींना प्रथम क्रमांकास एल सी डी टिव्ही व पैठणी साडी, द्वितीय क्रमांक कुलर,तृतीय क्रमांकासब ओव्हन, चतुर्थ क्रमांकास टेबल फॅन, पाचव्या क्रमांकास इस्त्री, तर श्री  स्वामी समर्थ ज्वेलर्स बारामतीकर अशोक ढेकळे यांच्या वतीने नथ ,पैंजण,जोडवी, चांदीचा छल्ला, चांदीचा शिक्का अशी बक्षिसे ठेवण्यात आली असून प्रत्येक सहभागी स्पर्धकाला मंडळाच्या वतीने आकर्षक भेट वस्तू देण्यात येणार आहे.

        आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये संगीत महाल, लावणी सम्राज्ञी वन्स मोर क्विन खुशी शिंदे यांचा लावणी कार्यक्रम, दुबई रिटर्न धनश्री मुठे यांचा डी जे म्युझिकल नाईट,  गौरी पुणेकर यांचा धमाका ऑर्केस्ट्रा, सुजाता भाटे व ऐश्वर्या पुणेकर यांचा नादाला माझ्या लागू नका, अर्चना सावंत यांचा अप्सरा आली हाय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून भव्य दिव्य आहे जंगी विसर्जन मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे.

    या नवरात्र उत्सवात   राजकीय,प्रशासन, सामाजिक व पत्रकार अशा विविध क्षेत्रातील क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते देवीची आरती करण्याचा मन देण्यात येणार असून असून त्यांच्या कार्याला अनोख्या पद्धतीने गौरविण्यात येणार आहे.

महिलांच्या सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे व स्वयंसेवक - नवरात्री उत्सवाच्या कार्यक्रमासाठी येणाऱ्या महिला भगिनींच्या सुरक्षिततेसाठी मंडळाच्या वतीने सी सी टी व्ही ,स्वयंसेवक अशी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

भव्य मंडप व भाविक भक्तांसाठी रेड कार्पेट -
  धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमातही ३० बाय ५० चा भव्य मंडप व आकर्षक स्टेज साकारण्यात आले आहे यावर आकर्षक विद्युत रोषणाई व साऊंड सिस्टीम लावण्यात आली आहे. 
    नवरात्री कार्यक्रमासाठी व देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी रेड कार्पेट टाकण्यात आले असून सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळी महिला व पुरुष असे दोन विभाग करण्यात आले आहेत तसेच बॅरीगेट व्यवस्था करण्यात आली असल्याने मोठ्या प्रमाणात सुरक्षिततेच्या वातावरणात भाविकांना धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेता येणार आहे.

       या नवरात्रोत्सवात विवीध सांस्कृतीक कार्यक्रमांचे उत्कृष्ट आयोजन व नियोजन करण्यात आले आहे . आकर्षक रोषणाई, भव्य मंडप, स्टेज, साऊंड व्यवस्था व महिला व बालकांच्या  सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आल्याने हा उत्साव महत्त्वपूर्ण ठरनार आहे .
 दुर्गामाता नवरात्रोत्सव मंडळाचे संस्थापक पंडीत आप्पा दरेकर व आधारस्तंभ रामदास दरेकर यांचे मार्गदर्शना खाली अध्यक्ष लक्ष्मण दरेकर, उपाध्यक्ष अशोक करडे यांनी संचालक मंडळाच्या सहकार्याने सर्व उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यात येणार आहेत.

आमदार अशोक पवार यांचा सर्वात मोठा बॅनर -
   सणसवाडी ग्रामस्थ व आमदार अशोक पवार यांच्या जिव्हाळ्याचे नाते असून येथील नागरिक व आमदार पवार हे नेहमीच चर्चेचा विषय असतात.येथे नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमस्थळी भला मोठा आमदार अशोक पवार यांचा बॅनर , स्टेजच्या बाजूला असणारा दहा फूट उंचीचा बॅनर,चौकात ठिकठिकाणी लावलेले भाविक भक्तांच्या स्वागतासाठी आमदार अशोक पवार व कार्यकर्त्यांचे बॅनर हे मात्र वातावरण निर्मिती करत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!