हवेली प्रतिनिधी
"युवा संघर्ष पदयात्रा" आमदार रोहीत दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक पुण्यभूमी,पवित्र तिर्थक्षेत्र तुळापूर (ता हवेली) येथील शौर्यपीठ श्री छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळावरून दि.२५.१०.२०२३ रोजी प्रारंभ होणाऱ्या पदयात्रेचे पुणे जिल्हाचे नियोजन (पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष) देवदत्त निकम यांच्या नियोजनात होणार असल्याने त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तुळापूर व वढू बुद्रुक येथे श्रीछत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळाचे दर्शन घेऊन बैठक घेतली.
यावेळी ( पुणे जि.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक अध्यक्ष) स्वप्निल भैय्या गायकवाड, (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिरूर तालुका अध्यक्ष) विश्वास काका ढमढेरे व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित दरेकर तुळापूर गावच्या (सरपंच) गुंफा इंगळे, (मा. सरपंच) गणेश पुजारी, (मा.उपसरपंच) संतोष शिवले, राजाराम शिवले, (वढू खुर्द मा. सरपंच) अनिल चोंधे, संजय शिवले, (मा.उपसरपंच) रुपेश शिवले, पांडुरंग शिवले, (मा. चेअरमन) शांताराम शिवले (मा. व्हाईस चेअरमन), हनुमंत शिवले (संचालक), किसन पुजारी (कार्यकारी अधिकारी), विजय वाळुंज (राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष पुणे जिल्हा), शिरुर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष तुषार दसगुडे,चेअरमन सचिन पवार,सरपंच प्रफुल्ल शिवले,सरपंच सरपंच धर्मराज वाजे,सरपंच मारुती थेऊरकर युवक नेते सनि थिटे,विशाल वाबळे, विकास शिंदे (माहिती सेवा समिती अध्यक्ष), सोमनाथ कंद (राष्ट्रवादी सदस्य), यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित होते.
युवकांचे प्रेरणास्थान आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली "युवा संघर्ष" यात्रेची सुरुवात श्री क्षेत्र तुळापूर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळावरून प्रारंभ २५ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ६.०० वाजता प्रारंभ होईल. ही यात्रा ४३ दिवसात ८०० किलोमीटर पायी प्रवासाची असेल दररोज यात्रा सहा वाजता सुरुवात होणार असून यात्रेचा पहिला टप्पा १० ते ११ किलोमीटरचा असेल त्यानंतर दुपारी १२ ते ४ या वेळेत भोजन व थोडी विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा प्रवास सुरू राहील. दररोज ही यात्रा १८ ते २० किलोमीटर अंतर चालणार आहे. ही यात्रा चालताना मार्ग सोडून इतर वळविण्याचा आग्रह नागरिकांनी करू नये नागरिकांनी मार्गावरती येऊन स्वागत करू शकता ही पदयात्रा पक्ष विरहीत असून कुठल्याही पक्षाचे चिन्हं नाही या संघर्ष यात्रेत महिला, भगिनी, तरुणांनी व नागरिकांनी, ग्रामस्थांनी सहभाग घ्यावा तसेच संध्याकाळी मुक्काम असेल त्या ठिकाणी पारंपारिक वाद्य, शाहीर, पोवाडे,गायनाचे कार्यक्रम, भजन, व्याख्यान, प्रवचन, मुक्कामी ठिकाणी रात्री करू शकता. असे आवाहन कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांनी नागरीकांना केले.