प्रतिनिधी हवेली
बकोरी (ता. हवेली): सिमेंटचा पोल डोक्यात मारल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. याप्रकरणी तीन आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना सोमवारी (दि.१६) रात्री साडे आठच्या सुमारास हवेली तालुक्यातील बकोरी गावातील वारघडे वस्ती येथे घडली या घटनेत दोनजण गंभीर जखमी झाले आहेत.सुहास हरिदास शिंदे (रा. वारघडे वस्ती, बकोरी गाव, ता. हवेली) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर संदिप हरिदास शिंदे आणि हरिदास केरबा शिंदे हे जखमी झाले असून याबाबत संदिप शिंदे याने लोणिकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी किसन पवार, बालाजी पवार, दिगंबर पवार (सर्व रा. बकोरी गाव, ता. हवेली) यांच्यावर 307, 326, 324, 323, 34 नुसार गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात 302 कलम वाढवण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किसन पवार फिर्यादीच्या पत्नीला मोबाईवर मेसेज करुन त्रास देत असल्याने वाद झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी जखमी व आरोपी सोमवारी रात्री फिर्य़ादी यांच्या घरासमोर बसले होते. त्यावेळी त्यांच्यात पुन्हा वाद झाले. आरोपींनी फिर्य़ादी, त्यांचा मयत भाऊ व वडिल यांना धक्काबुक्की करुन मारहाण केली. त्यावेळी किसन पवार याने घरासमोर पडलेला सिमेंटचा पोल सुहासच्या डोक्यात मारला. तर बालाजी पवार याने फिर्यादी यांच्या वडिलांच्या डोक्यात दगड व विटा मारुन मारहाण केली तर दिगंबर पवार याने फिर्यादी यांना लोखंडी हत्याराने डोक्यात मारुन गंभीर जखमी केले.
जखमी झालेल्या सर्वांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिघांवर उपचार सुरु असताना सुहास शिंदे याचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच येरवडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत कांईगडे,पोलीस निरीक्षक (गुन्हे) मारुती पाटील
सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, सहायक पोलीस निरीक्षक निखिल पवार,सहायक पोलीस निरीक्षक शिरिष भालेराव, यांनी घटनास्थळाला भेट दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे मारुती पाटील करत आहेत.