लोणी काळभोर प्रतिनिधी
आज मंगळवार रोजी सदावर्ते विरोधात लोणी काळभोर मधील मराठा समाज आक्रमक; निवेदन देत केली गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.शनिवारी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सभा पार पडली. यानंतर सदावर्ते यानी जरांगेंच्या सभेचा उल्लेख सभा नसून जत्रा असा केला होता. यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे.
जरांगे पाटील यांची सभा हे केवळ एका यात्रेच स्वरुप आहे. यात्रेला लोक येतात आणि मजा करुन जातात", असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं होतं. या टीकेवरुन आक्रमक झालेल्या मराठा समाजाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सर्वत्र महाराष्ट्र भर केली आहे.
जरांगे यांच्या सभेसाठी मराठा समाज एकवटला व आपल्या एकजुटीतून मराठा समाजाच्या वेदना दिसून आल्या. या सभेतील गर्दी ही कुठल्याही कॅमेऱ्यात व छायाचित्रातही न मावनारी होती. परंतु, गुणरत्न सदावर्ते या व्यक्तीने या सभेबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. त्यांनी ही सभा नसून जत्रा आहे. असं वक्तव्य केल्याने मराठा समाजात संतापाची लाठ पसरली असून सदावर्तेंवर तातडीने गुन्हा नोंद करा",असे हवेली तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने सदावर्ते यांच्या वक्तव्याच्यया विरोधात तालुक्यातील लोणी काळभोर पोलीस ठाण्यात मंगळवार दिनांक 11 वाजता.निवेदन देण्यात आले.यावेळी निलेश काळभोर,सूर्यकांत काळभोर,अमित काळभोर,संकेत चौधरी, अनिकेत मुळीक,जाहीर निषेध व्यक्त करत निवेदन दिले.