सुनील भंडारे पाटील
वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल डॉ. चंद्रकांत कोलते यांना वाघोली डॉक्टर्स असोसिएशनच्या दांडिया सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त वाघोली येथील सिझन्स बँक्वेट हॉलमध्ये असोसिएशनचे संस्थापक डॉ. विनोद सातव, अध्यक्ष डॉ. भूषण विधाते, सचिव डॉ. मच्छिंद्र काशीद, खजिनदार डॉ. नितीन पवार यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत पुणेरी पगडी घालून मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन प्रथम जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ. कोलते यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. बाळासाहेब हरपळे, डॉ. स्मिता कोलते, लेडीज कार्यकारिणी सदस्य डॉ. पल्लवी मेहेरे, डॉ. वैशाली जायकर, डॉ. सायली भुजबळ, डॉ. दाफिया चिंचाणीकर, डॉ. धनश्री शिंदे, डॉ. रुचा कोलते, डॉ. ज्योती जाधव आदींनी अभिनंदन केले.
कार्यक्रमास वाघोली डॉक्टर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह दोनशे सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा देखील सन्मान करण्यात करण्यात आला. याप्रसंगी डॉक्टर सातव यांनी डॉक्टर चंद्रकांत कोलते यांचे जीवना बद्दल सर्व माहिती उपस्थित यांना दिली तसेच जुन्या काळामध्ये वाघोली डॉक्टर असोसिएशनची स्थापना करून कोलते यांनी एक नवीन दिशा दिली, तसेच आपल्या वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून समाजाची उत्तम प्रकारे सेवा केल्याचे सांगितले, डॉक्टर चंद्रकांत कोलते यांनी आपले मनोगत व्यक्त केले, यावेळी सदय स्थितीत चालू असलेल्या नवरात्र उत्सवानिमित्त महिलांसाठी दांडियाचे आयोजन करण्यात आले होते,
वाघोली डॉक्टर असोसिएशन तर्फे पत्रकारांचा देखील आदर्श पत्रकार जीवन गौरव ने सन्मानित करण्यात आले,सुरेश वांढेकर, निलेश कांकरिया, दीपक नायक,विजयराव लोखंडे, सुनील भंडारे पाटील, ज्ञानेश्वर पाटेकर, शंकर पाबळे, सोमनाथ आव्हाळे, प्रीती पाठक,आदी पत्रकारांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला,