सुनील भंडारे पाटील
पुणे नगर महामार्गावर लोणीकंद (तालुका हवेली) येथे शासकीय परवानगी मधील नियमांची पायमल्ली करत टोरेंट गॅस कंपनीच्या वतीने जोमाने काम चालू असून हवेली मधील एका बड्या नेत्याच्या पाठबळाने काम जोमात चालू आहे, लोणीकंद ग्रामस्थांचे मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे, अशी चर्चा नागरिकांमध्ये चालू आहे,
वास्तविकता सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हाधिकारी पुणे यांच्या परवानगीनुसार रस्त्यापासून 15 मीटर बाहेर अशी तरतूद असताना रोडटच मोठे मोठे खड्डे तयार करण्यात आले आहेत, शिवाय उत्खननाची माती रस्त्यावर विखुरली आहे, कोट्यावधी रुपये खर्च करून बनवण्यात आलेल्या पुणे नगर महामार्गाची पार वाट लागत आहेत, यामुळे अपघाताची शक्यता आहे, खोदकामामुळे महावितरणची केबल तुटल्याने परिसरातील वस्त्यांमधील लोकांना एक एक दिवस अंधारात काढावा लागत आहे, गाव तसेच वस्त्यांमधून, चौकांमधून जाणारे या पाईपलाईनची भीती लोकांच्या मनात तयार झाली असून हवेली तालुक्यातील एका बड्या नेत्याच्या वरद हस्तामुळे तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करण्याची अवस्था नागरिकांची झाल्याचे असल्याची चर्चेला नागरिकांमध्ये उधाण आले आहे, अवैध चाललेले हे काम तातडीने तात्पुरते बंद न करता कायमस्वरूपी बंद करावे अशी मागणी नागरिक वारंवार करत आहेत,