श्री रामचंद्र इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये युवक स्वररंग कार्यक्रम उत्साहात

Bharari News
0
सुनील भंडारे पाटील 
      सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ व  श्री रामचंद्र एज्युकेशन सोसायटीचे श्री रामचंद्र कॉलेज  इंजिनीरिंग  लोणीकंद पुणे (ता हवेली) यांच्या संयुक्त विद्यमाने युवक महोत्सव स्वररंग -2023 हा सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच लोणीकंद  येथे  पार पडला. 
     या कार्यक्रमाचे उद्घाटन सरस्वती पूजन व दिप प्रज्वलन करून करण्यात आले. याप्रसंगी श्री रामचंद्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष मारुती (बापु) रामचंद्र भुमकर  व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ.अभिजीत कुलकर्णी सर, तसेच डॉ.नितीन घोरपडे सर व्यवस्थापन परिषद सदस्य अध्यक्षांची उपस्थिती होते.  विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण  विकासासाठी  सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी असे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले  जातात . मागील वर्षी व याही वर्षी श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनीरिंग लोणीकंद पुणे या ठिकाणी, पुणे जिल्ह्यातील महाविद्यालयासाठी या सांस्कृतिक स्पर्धा  करण्यात आल्या होत्या .         या कार्यक्रमाचे  उद्घाटनप्रसंगी  विद्यापीठाचे डॉ. अभिजीत कुलकर्णी सर यांनी  विद्यापीठातील कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील प्रगती बाबत आनंद व्यक्त केला व विद्यार्थ्यांना या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.  त्याचप्रमाणे श्री रामचंद्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष मारुती रामचंद्र भुमकर  यांनी आपल्या  मनोगतामध्ये सांगितले कि, प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये  शैक्षणिक अभ्यासक्रमा व्यतिरिक्तही अंतर्गत असा एक सुप्त कला गुण लपलेला असतो तो गुण सादर करण्यासाठी अशा एका  मुक्त व्यासपीठाची गरज असते कि जे या महाविद्यालयामार्फत विद्यापीठाने  उपलब्ध करून दिले आहे.
      सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सदानंद भोसले यांनी श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनीरिंगने केलेल्या कार्यक्रमाच्या नियोजनाचे व व्यवस्थेचे कौतुक केले तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातही सांस्कृतिक क्षेत्रामध्ये भरारी  घेण्याबाबत आवाहन केले. या कार्यक्रमाप्रसंगी श्री रामचंद्र एज्युकेशन सोसायटीच्या लोणीकंद कॅम्पसच्या कॅम्पस डायरेक्टर सायली भुमकर मॅडम, श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनीरिंगचे प्राचार्य  डॉ. अविनाश देसाई सर, पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास समन्वयक स्वामीराज भिसे, सुरज शिंदे, नयना भागवत, प्राध्यापक बोराटे, पंजाब नॅशनल बँकेचे ब्रांच मॅनेजर रोहित देशमुख सर, बी . जे . कॉलेज चे प्राचार्य गायकवाड सर, रमेश गायकवाड सर तसेच महाविद्यालयाचे सर्व विभागाचे विभागप्रमुख व सर्व शिक्षक, शिक्षकेतर सहकारी वर्ग या वेळी उपस्थित होते .
       दिवसभर चाललेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विविध महाविद्यालयातील विध्यार्थ्यानी आपला उत्तम सहभाग नोंदवला. या सांस्कृतिक महोत्सवामध्ये नृत्य, गायन, नाट्य, एकांकिका, व्यंगचित्र या आणि अशा ३३ कला प्रकारातील स्पर्धा घेण्यात आल्या. जवळपास २५ पेक्षा अधिक महाविद्यालयातील ६०० पेक्षा अधिक स्पर्धकांनी आपली कला  या कार्यक्रमांमध्ये सादर केली. स्पर्धेचे गांभीर्य व त्यातील चढाओढ विचारात घेता विद्यापीठातील नामांकित  परीक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे परीक्षण केले व त्यानुसार स्पर्धेचा निकाल त्या दिवशी सायंकाळी साडेसहा वाजता जाहीर करण्यात आला.
        स्वररंग  २०२३ कार्यक्रमातील प्राविन्य मिळविलेल्या स्पर्धकांची पुढील फेरी  संगमनेर येथील महाविद्यालयामध्ये आयोजित केली असल्याची माहिती विद्यापीठाच्या प्रतिनिधी मार्फत देण्यात आली.कार्यक्रमाच्या सांगता समारंभ प्रसंगी विद्यापीठाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
       या कार्यक्रमाच्या सांगता समारंभ मध्ये आपले मनोगत व्यक्त करताना  स्पर्धकांनी व पालकांनीही महाविद्यालयाने केलेल्या व्यवस्थेबद्दल महाविद्यालयाचे  आभार मानले. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन महाविदलयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख  . डॉ. सुषमा तायडे व विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. प्रिया पाटील यांनी केले. सर्व शिक्षक, शिक्षकेतर सहकार्यांनी उत्कृष्ट नियोजन केल्यामुळे व सर्वच सहकाऱ्यांनी  प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या केलेल्या मदतीमुळे या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करता आले असल्याचे मत विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. प्रिया पाटील यांनी आपल्या आभारपर भाषणामध्ये व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रचालन प्रा. दीपाली होदाडे व आभार प्रदर्शन प्रा. गिरीशा बोंबले यांनी केले .
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!