सुनील भंडारे पाटील
पुणे नगर महामार्ग लगत लोणीकंद तसेच कोरेगाव भीमा भागामध्ये शासकीय नियमांची पायमल्ली करत टोरेंट गॅस कंपनीच्या वतीने राजरोषपणे काम चालू आहे, यापासून ऐतिहासिक वास्तू विजय स्तंभ तसेच ब्रिटिश कालीन पुल त्याचप्रमाणे रहिवाशांना धोका असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे,
पुणे नगर महामार्ग लगत पाईपलाईनच्या खोदकामामुळे महामार्ग लगत मोठमोठे खड्डे तयार झाले असून खोदलेली माती सर्रासपणे लोणीकंद येथे रस्त्यावर टाकली जात आहे, त्यापासून नागरिकांना व प्रवाशांना धोका आहे तसेच अपघात होण्याचे शक्यता वर्तवण्यात येत असून ऐतिहासिक ब्रिटिश कालीन पूल तसेच जयस्तंभाला धोका असल्याच्या तक्रारी पुणे जिल्हाधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला प्राप्त असून हे काम काही काळ बंद होत आहे, नागरिक शांत झाले की परत हे काम चालू होत आहे, अशी वस्तुस्थिती या ठिकाणी दिसत आहे, त्याचप्रमाणे संबंधित पाईपलाईन खोदकामामध्ये ठेकेदाराकडून परवानगी मधील नियमांचे उल्लंघन होत असून,