लोणी काळभोर प्रतिनिधी
शिंदवणे (ता. हवेली,) पुणे या ठिकाणी डेव्हलपर्सकडून शिंदवणे हद्दीमध्ये बेकायदेशीर गुंठेवारी प्लाॅटविक्री होत असलेचे प्रत्यक्षात दिसून आलेले आहे. डेव्हलपर्स यांच्याकडून बेकायदेशीर गुंठेवारी प्लाॅटविक्री सुरु असलेकारणाने स्थानिक शेतक-यांनी ग्रामपंचायत शिंदवणे यांस लेखी तक्रारी अर्ज केलेले आहेत.
सदर तक्रारी अर्जात "डेव्हलपर्स यांच्याकडून प्लाॅट खरेदारकांची फसवणूक, शिंदवणे गावातील प्लाॅट विक्रीतील प्लाॅटमध्ये कमी रस्ता ठेऊन प्लाॅटखरेदीदारकांची फसवणूक, शिंदवणे गावामध्ये प्लाॅटींग केलेल्या क्षेत्राला कुठलाही अधिकृत रस्ता नाही, जे प्लाॅटला गेलेले रस्ते आहेत, ते रस्ते शेतक-यांनी शेतक-यांसाठी शेतीची मालवाहतूक आणि शेतीच्या दळणवळणासाठी रस्ते राखीव, प्लाॅटींग केलेल्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची अधिकृत लाईट नाही, प्लाॅटींग केलेल्या क्षेत्रामधून सांडपाणी व शौचालयाची ड्रेनेज लाईन फक्त प्लाॅटींग केलेल्या क्षेत्रामध्येच केली आहे, ड्रेनेजलाईन बाहेर ओढ्याला सोडलेली नाही,
शिंदवणे गावामध्ये जेवढे क्षेत्र प्लाॅटींग केले आहे. त्या कोणत्याही क्षेत्राची किंवा प्लाॅटींगची पीएमआरडीए ची कोणतीही रीतसर परवानगी घेतलेली नाही, प्रत्येक प्लाॅटधारकाने प्रत्येकाच्या प्लाॅटमध्ये बोअरवेल घेतल्यामुळे चर्तुसीमालगत असलेल्या शेतक-यांच्या विहीर व बोअरवेलचे पाणीसाठा कमी झालेला आहे, आजरोजी प्लाॅटींग केलेल्या क्षेत्रामध्ये ज्यांनी घरे बांधलेले आहेत त्यांनी प्लाॅटधारकाने रस्ते आणि पार्किंगसाठी जागा सोडलेली नाही, शिंदवणे गावातील हद्दीत डेव्हलपर्स हे बेकायदेशीरपणे खरेदीखत करुन प्लाॅटविक्री करत असलेचे नमूद केले आहे.
स्थानिक शेतक-यांच्या तक्रारी अर्जाची ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घेऊन डेव्हलपर्स यांना वारंवार पत्रव्यवहार करुनसुद्धा बेकायदेशीर गुंठेवारी करुन लोकांची फसवणूक करत आहेत. ज्या लोकांनी शिंदवणे गावामध्ये गुंठे खरेदीखताने घेतलेले आहेत. त्यांनी कुठल्याही शासकीय कार्यालयाची परवानगी न घेता अवैध्य बांधकाम केलेले दिसून आलेले आहेत. तरी प्लाॅट धारकांना सूचित करणेत येते की, ग्रामपंचायत आपणाला कुठलीही सुख-सुविधा देण्यास बांधील राहणार नाही. शिंदवणे गावातील प्लाॅटधारकांनी गुंठे खरेदीखत करायचे अगोदर, ज्या प्लाॅटमध्ये गुंठे खरेदी करणार आहेत त्याची माहिती ग्रामपंचायतमध्ये येऊन सदरचा प्लाॅट अधिकृत आहे किंवा नाही याची सर्व माहिती घेऊनच प्लाॅट खरेदी करावी. अन्यथा प्लाॅटधारक यांनी परस्पर घेतलेल्या गुंठ्याचे व बांधकामाचे ग्रामपंचायत दप्तरी अधिकृत नोंद होणार नाही असा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतलेला आहे. यासंदर्भात ग्रामपंचायत प्रशासनाने संबंधित वरिष्ठ कार्यालयाला पत्रव्यवहार करुन, शिंदवणे गावामध्ये बेकायदेशीर गुंठेवारी प्लाॅटविक्री बंद करावी अशी मागणी शिंदवणे गावचे सरपंच ज्योती दत्तात्रय महाडीक, उपसरपंच लता अशोक माने व माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य गणेश भाऊसाहेब महाडीक यांनी केली असल्याची माहिती प्रसारमाध्यमांना बोलताना दिली.