लोणी काळभोर अनिकेत मुळीक
शिक्रापूर (ता. शिरुर) येथे नामांकित कंपनीचे बनावट लेबल बनवून हलक्या दर्जाच्या कपड्यांना लावून बनावट ब्रॅण्डिंगचे कपडे नामांकित कंपनीचे असल्याचे भासवून विक्री करणाऱ्या ब्रँड वर्ल्ड व टॉप ७ या दोन दुकानात ब्रँड प्रोटेक्टस इंडिया लिमिटेडच्या पदाधिकाऱ्यांनी छापे टाकत लाखो रुपयांचे कपडे जप्त करत शब्बीर युसुफ तांबोळी व अनिकेत आदिनाथ गायकवाड या दोघांवर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला,
शिक्रापूर येथे कपड्यांच्या दुकानाचे मोठे जाळे निर्माण झालेले असताना काही ठिकाणी नामांकित कंपनीचे लेबल व ट्रेडमार्क बनावट व हलक्या दर्जाच्या कपड्यांना लावून विक्री केली जात अल्स्याची माहिती ब्रँड प्रोटेक्टस इंडिया लिमिटेडच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली, त्यांनतर सदर कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्रापूर येथील तळेगाव रोड परिसरातील ब्रँड वर्ल्ड तसेच चाकण चौक येथील टॉप ७ या दोन्ही दुकानात जाऊन अचानकपणे छापे टाकले असता त्यांना दोन्ही दुकानात नामांकित कंपनीच्या नावाने बनावट ट्रेडमार्क व लेबल हलक्या दर्जाच्या कपड्यांना लावून ग्राहकांना विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले,
यावेळी दोन्ही दुकानातील लाखो रुपयांचे कपडे जप्त करत महेंद्र सोहन सिंग वय ३६ वर्षे रा. बिरोलीया परवा ता. पाली जि. पाली राजस्थान यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी शिक्रापूर तळेगाव रोड येथील ब्रँड वर्ल्ड दुकानाचे संचालक शब्बीर युसुफ तांबोळी वय २७ वर्षे रा. करंजेनगर शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. मढेवडगाव (ता. शिरुर )जि. पुणे व चाकण चौक येथील टॉप ७ दुकानाचे संचालक अनिकेत आदिनाथ गायकवाड रा. कोलवडी (ता. हवेली) जि. पुणे या दोघांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार व पोलीस शिपाई नीरज पिसाळ हे करत आहे.