लोणी काळभोर अनिकेत मुळीक
भरारी या न्यूज माध्यमातून आलेल्या शेतकऱ्यांच्या बाजारात दुबार विक्रेते मालामाल या बातमीची दखल घेऊन पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी मांजरी उपवासाला दुबार विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी संचालक मंडळ ठामपणे उभे असल्याची माहिती संचालक सुदर्शन चौधरी यांनी दिली,
याबाबत हवेली तालुक्यातील मांजरी येथील कै. अण्णासाहेब मगर उप बाजारातून शेतकऱ्यांचे हाल चालले असल्याचे दिसून येत आहे. हा बाजार फक्त शेतकऱ्यांच्याच साठी तयार केला असून शेतकरी ते थेट विक्रेते अशी या बाजाराची संकल्पना आहे.
पण रोज शेतकयांचा माल घेऊन त्याची कमिशनवर विक्री करुन भरघोस नफा मिळविणारे दुबार विक्रेते या बाजारातून मालामाल झाले असून शेतकरी मात्र उपाशी राहिला असल्याची व्यथा भरारी न्युज मध्ये मांडली होती. बाजार समितीची या दुबार विक्रेत्यांना पाठबळ असल्याची शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू होती पण आजच्या निर्णयाने बाजार समिती शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभी राहिली असल्याचे चित्र दिसून आले. यावेळी संचालक सुदर्शन चौधरी, प्रशांत काळभोर, प्रकाश जगताप व सचिव राजाराम धोंडकर उपस्थित होते. या दुबार विक्रेत्यांवर कोणाचेही नियंत्रण राहिले नव्हते. हा बाजार शेतकऱ्यांचा असून शेतकऱ्यांनाच शेतकऱ्यांच्या बाजारात दुबार विक्रेते मालामाल माल ठेवण्यासाठी जागा मिळत नसल्याचे दिसून आले होते. दुबार विक्रेते बाजारच्या शेडमध्ये अशी अवस्था या बाजारात झाली होती.
शेतकऱ्यांनी देखभाल करून जे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत नाही. त्याच्या कितीतरी पटीने अधिक उत्पन्न हे दुबार विक्री करणारे मिळवत होते. दुबार विक्रेते जरी सांगत असतील की मी शेतकरी आहे आणि माझ्या शेतातून माल आणलेला आहे तरी दररोज महिनोंमहिने एकच माल रोज पाच ते सहा हजार गड्डी विकणे हे भारतातील कुठल्याही छोटया शेतकन्याला शक्य नसल्याचे हवेलीतील शेतकऱ्यांनी सांगितले.शेतकरी नेता म्हणून घेणारा आज दुबार विक्रेत्यांची बाजु घेतनाचा व्हिडीओ व्हायरल झाला असुन त्याची चर्चा हवेली तालुक्यात सुरू आहे.वेळ दुपारी दोनची आहे. हे दुबार विक्री करणारे व्यापारी बारा ते दोन वाजण्याच्या आसपास माल खरेदी करुन ठेवून नंतर दुपारी दोन नंतर त्याची विक्री करून भरघोस नफा कमवत असुन आणि रोजच ते विक्री करण्यासाठी हजर असल्याने खरेदीसाठी येणारे व्यापारीही प्रथमतः त्यांचाच माल खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांच्या मालाची विक्री होणे कठीण होऊन बसले होते.
यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत असे .त्यामुळे शेतकऱ्यांनी या विषयी माध्यमांना पत्रकार सचिन सुंभे माहिती देताच
बातमी आल्यावर दुबार विक्री बंदचा निर्णय घेत असल्याची माहिती सचिव राजाराम धोंडकर यांनी दिली. दुबार विक्रेत्यांनी बाजाराच्या आवारात ठिय्या आंदोलन करताच पोलीस प्रशासनाने संचालक मंडळ, अधिकारी वर्ग व दुबार विक्रेते यांनी मार्ग काढण्यासाठी सूचना केल्यावर हे आंदोलन थांबविण्यात आले. याबाबत उद्या सभापती दिलीप काळभोर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वांची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार असून कुठल्याही प्रकारे शेतकन्यांच्या विरोधात निर्णय घेणार नसल्याचे संचालक मंडळांनी सांगितले.