राज्य सरकारने सुरू केलेल्या कंत्राटी भर्ती च्या निषेधार्थ मलकापूर कृती समितीच्या वतीने सचिन शिंगोटे यांच्या नेतृत्वात गांधी जयंतीच्या दिवशी तहसील कार्यालयासमोर हजारो विद्यार्थ्यांना घेऊन लक्षणीय एक दिवशी ठिय्या आंदोलन करून सरकारचा निषेध केला त्यावेळी डॉ. अमरकुमार आनंद तायडे म्हणाले की सरकारने कंत्राटी भरती प्रक्रिया रद्द करण्याच्या आवाज घरा घराघरातुन निघाला पाहिजे आणि ज्या वेळी हा आवाज येईल तो एक जनआंदोलन होईल.
जर सरकारने कंत्राटी भरती प्रक्रिया रद्द केली नाही तर हा लढा यापेक्षाही तीव्र करू असे विद्यार्थ्यांनी जाहीर केले त्यावेळी मंडपाला विधानसभेचे आमदार राजेश एकडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रवीण पाटील
नगरसेवक राजू पाटील, बंडूभाऊ चौधरी, वंचितचे सुशील मोरे यांनी भेट दिली त्यावेळी सचिन शिंगोटे, निलेश नारखेडे, चेतन जगताप, सिद्धार्थ इंगळे, शिवाजी हिवाळे,डॉ.अमरकुमार तायडे, नरेंद्र सुरडकर, करण झनके, सपकाळ सर, शेखर पाटील, शंकर पाटील कुदन, विशाल पाटील, असे असंख्य विदयार्थी हजर होते,