सुनील भंडारे पाटील
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळी ग्रामस्थांच्या वतीने बैठकीचे आयोजन करून लोकनेत्यांना गावामध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली असून पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली आहे,
संपूर्ण राज्यभर गाजत असलेला मुद्दा सध्या मराठा आरक्षणासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाचा निर्णय घेतल्यानंतर संपूर्ण राज्यभर आपल्या न्याय हक्कासाठी साखळी उपोषण आंदोलनाला सुरुवात झाली असून अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ, धर्मपीठ, शक्तीपीठ, बलिदान पीठ, प्रेरणा पीठ, राज्याची दुसरी हिंदू पंढरी श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (तालुका शिरूर) येथे लोकनेत्यांना गाव बंदीचा ठराव मंजूर करण्यात आला,
धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळी झालेल्या या बैठकीत मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते, यावेळी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिशा ठरवण्यात आली, पुढच्या पिढीच्या तसेच मराठा समाज शेतकरी यांच्या मुलांवर होणारा अन्याय यापुढे सहन केला जाणार नाही, मुलांच्या भवितव्याचा विचार करता आरक्षण महत्त्वाचे असल्याने आरक्षण घेतल्याशिवाय आंदोलन थांबवायचे नाही, राज्य सरकारने तातडीने निर्णय घेऊन आमच्या हक्काचे आरक्षण आम्हाला द्यावे, तसेच जरांगे पाटलांचे उपोषण लवकर निर्णय देऊन थांबवावे अशी मागणी यावेळी सर्वांनी केली,