ऐतिहासिक ब्रिटिश कालीन विजय स्तंभ तसेच कमानी दगडी बांधकामातील पूल याच्या जवळून चाललेले टॉरेट गॅस कंपनीचे काम तातडीने थांबवण्यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, या संबंधित निवेदने संबंधितांना देण्यात आले होते,
गेल्या काही दिवसापासून टोरेंट गॅस कंपनीच्या वतीने पुणे नगर महामार्गालगत परवानगी मधील नियमांची पायमल्ली करत राजरोसपणे पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम चालू आहे याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत असून ऐतिहासिक ब्रिटिश कालीन विजयस्तंभ तसेच कमानी दगडी बांधकामातील पुला जवळून मोठ्या ड्रिल मशीनच्या साह्याने खोदकाम चालू आहे, दरवर्षी १ जानेवारीला लाखो भीमसैनिक विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून येत असतात,
१ जानेवारी २०१८ रोजी येथे समाजकंटकांनी दंगल घडून आणली होती, ही पाईपलाईन येथून गेली तर काही माथेफिरू समाजकंटकाकडून अनुचित प्रकार भविष्यात घडू शकतो, तसेच ऐतिहासिक विजयस्तंभ, ब्रिटिश कालीन पूल, तसेच शेजारी असणारी विजयस्तंभ नगर लोकवस्ती याला या पाईपलाईन पासून धोका असून संबंधित काम तातडीने थांबवण्यासाठी ऐतिहासिक विजयस्तंभ चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन करत असल्याचे आंदोलकांनी यावेळी सांगितले,
रास्ता रोको आंदोलन संबंधी निवेदन पीपल्स रिपब्लिकन पार्टी दलित मुक्ती सेना पुणे जिल्हाध्यक्ष लताताई शिरसाट यांनी राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे, पुणे जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे, महासंचालक कार्यालय बार्टी यांना दिले होते,
रास्ता रोको आंदोलन प्रसंगी राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, लताताई शिरसाट, डॉक्टर विजय साळवे,देविदास सावते, छाया बचुटे, संध्या बचुटे, बेगम सय्यद, प्रसाद गरुड, संदीप शेलार, रियाज पठाण, गणेश बचुटे, अक्षय बचुटे, शाहू बचुटे, करण जावळे, कमल धायवड, तसेच मोठ्या संख्येने पीपल्स रिपब्लिकन पार्टी, भीम आर्मीचे कार्यकर्ते उपस्थित होते,