सणसवाडीत सशस्त्र दरोडा घालणारे बारा तासात जेरबंद शिक्रापूर पोलिसाची काही तासांत धडाकेबाज कामगिरी

Bharari News
0
सुनील भंडारे पाटील
       सणसवाडी (ता. शिरुर) येथे पहाटेच्या सुमारास पायी चाललेल्या नागरिकांना कोयत्याचा धाक दाखवून लुटणाऱ्या पाच जणांच्या टोळक्यावर दरोड्याचे गुन्हे दाखल होताच काही तासात सदर दरोडेखोरांना जेरबंद करण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले असून श्रीकांत मिनिनाथ मारणे, रोहित बाबुराव पवार, गणेश नितीन जावडेकर, जितेंद्र शंकर चिंधे व अनिकेत अनिल वाघमारे असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहेत.
         सणसवाडी येथील एल & टी फाटा येथून हिमांशू पाटील, शिवा पटेल व कृष्णकांत आदिवासी हे तिघेजण ६ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास गावाहून येऊन घरी चाललेले असताना पाठीमागून दोन दुचाकीहून पाच युवक त्यांच्याजवळ आले, दरम्यान एका युवकाने हिमांशूच्या गळ्याला कोयता लावून शिवीगाळ दमदाटी करत दुसऱ्या युवकाने शिवा व कृष्णकांत यांना कोयता दाखवून शिवीगाळ, दमदाटी करत हालचाल केली तर मारून टाकू असे म्हणून हाताने मारहाण करत त्यांच्या जवळील मोबाईल व रोख रक्कम चोरून नेली होती, त्यांनतर घडलेल्या प्रकाराबाबत हिमांशू ब्रिजेशकुमार पाटील (वय २० वर्षे रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. तिगजा ता. मेजा जि. प्रयागराज उत्तरप्रदेश) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात पाच युवकांवर दरोड्या प्रकरणी गुन्हा दाखल केला, मात्र त्यांनतर दुपारच्या सुमारास कासारी काही युवक पुणे नगर महामार्गालगत निमगाव म्हाळुंगी फाटा येथे काही युवक असून त्यांच्याकडे कोयता असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे, पोलीस हवालदार कृष्णा व्यवहारे, शिवाजी चीतारे, शंकर साळुंके, चंद्रकांत काळे, अमोल दांडगे, रोहिदास पारखे, किशोर शिवणकर, अविनाश पठारे यांना मिळाली दरम्यान पोलिसांनी तातडीने सदर ठिकाणी जात युवकांची झडती घेतली असता त्यांच्याकडे चोरीचे मोबाईल तसेच कोयते मिळून आले त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी सणसवाडी येथे केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली, यावेळी पोलिसांनी श्रीकांत मिनिनाथ मारणे वय २८ वर्षे रा. शंकर मंदिर जवळ कोथरूड पुणे, रोहित बाबुराव पवार वय १८ वर्षे रा. धायरी फाटा पुणे, गणेश नितीन जावडेकर वय १८ वर्षे रा. रासकर मळा जनता वसाहत पर्वती पुणे, जितेंद्र शंकर चिंधे वय ३१ वर्षे रा. जांभळवाडी दत्तनगर कात्रज पुणे, अनिकेत अनिल वाघमारे वय २२ वर्षे रा. नंदनवन कॉलनी कोथरूड पुणे यांना शिक्रापूर पोलिसांनी अटक करत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे हे करत आहे.  
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!