सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले
विदिशा ,मध्यप्रदेश येथे नुकत्याच ६७ व्या राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धा पार पडल्या. या कुस्ती स्पर्धेत सणसवाडी येथील जय हनुमान तालीम संघाची राष्ट्रीय खेळाडू पै. मनस्वी पांढरे हिने १४ वर्षाखालील मुलींचे ३९ किलो वजन गटात संपूर्ण भारतात तृतीय क्रमांक पटकावत ब्रांझ पदक पटकावले.
मनस्वीला जय हनुमान तालीम संघ सणसवाडी येथे सराव करताना शिरूर केसरी पै. चंद्रकांत दरेकर ह्यांचे मार्गदर्शन लाभले तर नरेश्वर कुस्ती केंद्राचे वस्ताद पै. भांडवलकर यांनी तिला डावपेच शिकवत राष्ट्रीय स्पर्धेसाठी विशेष तयारी करून घेतली.उच्च ध्येय डोळ्या समोर ठेवून जिद्द , चिकाटीने मेहनत ,कष्ट केले तर हमखास यश मिळते हे मनस्वी ने ब्रांझ पदक पटकावून दाखवून देत इतर उदयोन्मुख खेळाडू पुढे एक आदर्श ठेवला आहे विशेष तीच्या आई वडीलाची मेहनत या मध्ये खुप आहे कोणताही खेळाडु हा आई वडील्याच्या पाठीब्यां शिवाय घडु शकत नाही म्हनुन खरच मनस्वी व तीचे आई वडीव यांचे सुध्दा खुप खुप अभिनंदन असे गौरवोउ्दघार तिचे मार्गदर्शक शिरूर केसरी पै.चंद्रकांत दरेकर यांनी या वेळी व्यक्त केले.
मनस्वीचे यशा बद्दल सर्व स्तरांमधून तिचे अभिनंदन होत आहे. या यशाबद्दल लवकर च तिचा जाहीर सत्कार ग्रामस्थांचे व जय हनुमान तालीम संघाचे वतीने घेण्यात येणार असलेचे जय हनुमान तालीम संघाचे पदाधिकारी पैलवान बाबाबसाहेब दरेकर व अॅड विजयराज दरेकर व देवरामभाउ दरेकर यांनी आशा जीद्दी व मेहनती खेळाडुन मुळे शिरूर तालुक्याचे कुस्तीचे भवीतव्य उज्वल आहे आसे गौरवौदगार अभिमानाने सांगितले,