आळंदी प्रतिनिधी आरिफ भाई शेख
आळंदी/वारकरी संप्रदायातील सातारकर फड म्हणून प्रचिती असलेल्या दादा महाराज सातारकर यांनी सुरू केलेल्या फड परंपरेतील हभप बाबा महाराज सातारकर यांची प्राणज्योत आज मालवली.मुंबईतील नेरूळ येथे त्यांनी वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. याच वर्षात त्यांचे धर्मपत्नी माई सातारकर यांचे फेब्रुवारी महिन्यात निधन झाले होते त्यानंतर आज हभप बाबा महाराज सातारकर यांनी अखेरचा श्वास घेतला. हभप बाबा महाराज सातारकर यांच्या कीर्तनाला हजारोंच्या संख्येने नेहमी गर्दी होत असे. बाबा महाराज सातारकर म्हणजे त्यांच्या तोंडातून सरस्वती बोलते आहे अशी कीर्तन ऐकणाऱ्यांना प्रचिती येत असे. शब्दांवरील प्रभुत्व आणि सोप्या भाषेत त्याचं महत्त्व पटवून देण्यामध्ये त्यांच्या कीर्तनाची ख्याती होती. कीर्तनामधून समाज प्रबोधन करताना समाजातील वाईट चालीरीती तसेच, जातीभेद, धर्मभेद, यावर हि ते नेहमी भाष्य करत. समाजाने ,प्रेम, सदभावना,जातीभेद भ्रम अमंगळ अशी जी शिकवणूक संतांनी दिली.त्यावर चालावे यासाठी बाबा महाराज सातारकर त्यांच्या प्रत्येक कीर्तनामध्ये आग्रही असत.
उद्या शुक्रवार दिनांक 27 रोजी मुंबईतील नेरूळ येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे दरम्यान नेरूळ येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेले आहे. संत साहित्याच्या गाढा अभ्यास. आणि विनोद बुद्धीने समाजाला जागृत करत प्रथा परंपरांवरील भाष्य त्यातच गोड आवाजातील हरिपाठ आणि गळ्यात तुळशीची माळ आहे का? हा आलेला प्रश्न वारकरी संप्रदायाला वैष्णवांचा मेळा आणि त्यांच्या परंपरेला आकर्षित करत राहिला. व बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली,