सुनील भंडारे पाटील
कोरेगाव भीमा (तालुका शिरूर) येथे भीमा नदी पात्रामध्ये आज एक मृतदेह आढळला असून सदर व्यक्तीला शिक्रापूर पोलिसांनी पोलीस मित्रांच्या मदतीने नदीपात्रातून बाहेर काढून पुढील कार्यवाही साठी शिक्रापूर येथील सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले. परंतु भिमा नदी पात्रात मृतदेह असल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने नदीपात्रात व भिमा नदीच्या पुलावर बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.
या संदर्भात शिक्रापूर पोलिसांनी दिलेली माहिती नुसार , भिमा नदीच्या पात्रात सकाळच्या वेळी पाण्यामध्ये एक मृतदेह तरंगताना दिसला यावेळी सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक पंडित मांजरे, पोलीस हवालदार सचिन मोरे यांनी घटनास्थळी धाव घेत पोलीस मित्र खंडू चकोर, स्वप्नील भोकरे यांच्या मदतीने सदर व्यक्तीला पाण्याबाहेर काढण्यात आले.
यावेळी सदर व्यक्तीचे नाव बापूराव बेलाजी साळवे (वय ५० वर्षे, रा. लोणीकंद, ता. हवेली) असल्याचे समजले. या बाबत मृताची पत्नी सुमन बापूराव साळवे (वय ३८ वर्षे) यांनी शिक्रापूर पोलिसांना माहिती दिली. की, बापूराव यांना पहिल्या पत्नीपासून एक मुलगा होता त्याचा मृत्यू काल दि. २५ रोजी मामाच्या घरी झाला होता. यावेळी घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार यांनी भेट देत सूचना दिल्या. पुढील तपास पोलीस हवालदार सचिन मोरे करत आहेत.