आळंदी प्रतिनिधी आरिफ भाई शेख
आळंदी/महाराष्ट्रभर सकल मराठा समाज आरक्षणासाठी एकवटला आहे संतापाची तीव्र लाट दिसत आहे आरक्षण मिळावं म्हणून मराठा समाजाचे टोकाचे पाऊल उचलून आहे यासाठी म्हणून जरांगे पाटील यांनी वारंवार विनंती केली आहे परंतु आरक्षण नसल्याचा वनवा हा चांगलाच पेटलेला दिसतोय आळंदीमध्ये वयोवृद्ध माजी सरपंचाने इंद्रायणी नदीमध्ये जलसमाधी घेत आत्महत्या केली आहे.
श्री व्यंकट ढोपरे वय वर्ष 60 रा. नेरे आंबेगाव मुळगाव उंबरदरा ,लातूर असे आत्महत्या केलेले व्यक्तीचे नाव आहे .आत्महत्या करताना सदर व्यक्तीने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली आहे. मुलाला मराठा आरक्षण नसल्याने नोकरी लागत नाही तसेच अनुकंपावर नोकरी मिळत नाही या नायरशातून सदर वृद्ध व्यक्तीने टोकाचे पाऊल उचलले आहे. नरे आंबेगाव येथे ते सध्या राहत असून काल दर्शनासाठी ते आळंदीला आले होते. काल अकरा वाजता नरे आंबेगाव येथून ते आळंदी साठी निघाले होते घरातील व्यक्तींना त्यांची त्याबाबत चिट्ठी आढळून आली त्याची मध्ये मी सरपंच असल्यापासून प्रयत्न करतोय मुलाला अनुकंपावर नोकरी लागत नाही सरकार गांभीर्याने घेत नाही 2012 सालापासून ही मुलाच्या नोकरीसाठी केलेल्या प्रयत्नामध्ये असफल झाले या कारणास्तव मी आत्महत्या करत आहे असा उल्लेख असल्याचे समजते रात्री आठच्या सुमारास आळंदी इंद्रायणी नदीवर त्याबाबत शोध मोहीम चालू करण्यात आली रात्री उशिरापर्यंत पिंपरी चिंचवड अग्निशामक दल आळंदी व्यवस्थापन समिती आळंदी पोलीस स्टेशन पोलीस दल या मार्फत इंद्रायणी नदीच्या सर्व बाजूने झाडा दळती घेत तपासणी करण्यात आली परंतु मृतदेह काही आढळला नाही मात्र आज दिनांक 28 रोजी दुपारी सव्वा एकच्या सुमारात जुन्या बांधाऱ्यांमध्ये हातपाय बांधल्याच्या अवस्थेमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला व्यंकटोपरे यांना पोहायला येत होते त्यामुळे स्वतःचे हातपाय बांधून त्यांनी आत्महत्या केली असे प्रथम दर्शनी दिसून येत आहे,
शैवविच्छेदनासाठी मृतदेह आळंदी पोलीस स्टेशन मार्फत पाठवण्यात आलेला असून पुढील तपास आळंदी पोलीस स्टेशन करत आहे.दरम्यान महाराष्ट्रातील मराठा आरक्षणासाठी बळी पडलेल्या संख्यांमध्ये आणखी एक भर पडले आहे सुमारे दहा जणांनी आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटलांना पाठिंबा देत या तीव्र प्रश्नाच लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र शासनाला जाग करण्या णसाठी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. अजून किती बळी महाराष्ट्र शासन घेणार ही दुःखद बाब असून याबाबत खेदाने लक्ष वेधण्याची गरज आहे.