आळंदी प्रतिनिधी आरिफ भाई शेख
आळंदी/मराठ्यांच्या लेकरांसाठी जीवाची परवा न करता उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आळंदीत साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे.आज उपोषणाचा दुसरा दिवस होता.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरासमोरील महाद्वार चौकात सकल मराठा समाज व आळंदी सर्कल ,आळंदी गावचे पंचक्रोशीतील सर्व गाव या साखळी उपोषणाला पाठिंबा देत सामील झाले आहेत, काल सायंकाळी सहा वाजता माऊलींच्या मंदिराच्या हैबत बाबा पायरीजवळ कॅण्डल मार्च साठी मोठ्या प्रमाणात महिला, मुलं ,मुली ,तरुण वर्ग, विद्यार्थी, वारकरी,विविध क्षेत्रातील कार्य करणारे समाज सेवक,एकत्रित आले होते.
अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची झळ महाराष्ट्र सरकारला सोसेनासी झाली आहे.मराठा समाजाच्या भावना तीव्र असून बऱ्याच गावांमध्ये पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे.
माऊलींच्या आळंदी मध्ये मराठा समाज एकवटला असून जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार आळंदीतील सकल मराठा समाज व आळंदी सर्कल व सहभागी झालेल्या ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.आळंदी पोलीस स्टेशनच्या वतीने विशेष पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली आहे.
उपोषण स्थळाची वेळोवेळी पाहणी करत, सेवा -सुविधांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. येणाऱ्या काळामध्ये मराठ्यांच्या लेकरासाठी लढणारा योद्धा जरांगे पाटील यांच्या पाठिंब्यासाठी आळंदीकरा कडून उचलले जाणारे पाऊल विशेष असेल असे चित्र दिसून येत आहे. माऊलींची भूमी हि वारकऱ्यांची कर्मभूमी आहे आणि यात माऊलीच्या दरबारातील महाद्वारातून ऐका आंदोलनाने पूर्वीच्या काळी महाराष्ट्रात सरकारला घरघर लागली होती. आता अंतरवली. सराटी येथील जरांगे पाटील नावाच्या वादळाने न्यायासाठी लढताना प्राण्याची बाजी लावली आहे. महाराष्ट्र सरकारला आणि पर्यायाने दिल्ली च्या तख्तला हे सोसनारे नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काल उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी आळंदीतील विविध सामाजिक संघटनांनी या साखळी उपोषणाला पाठिंबा दिला आहे.