सुनील भंडारे पाटील
पेरणे (तालुका हवेली) येथील ब्रिटिश कालीन ऐतिहासिक विजय स्तंभाच्या परिसरात अवैध व्यवसायाचा सुळसुळाट झाला असून पोलिसांच्या वरद हस्ताने चाललेले हे व्यवसाय तातडीने बंद करण्यासाठी राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टी पुणे जिल्हा महिला अध्यक्ष सीमाताई लक्ष्मण पांचाळ यांचे वतीने यांच्यावतीने आमरण उपोषण चालू आहे,
पोलीस आयुक्त, पुणे शहर पोलीस मुख्यालय पुणे 1 कार्यालय आता समोर चाललेली या उपोषणात पेरणे फाटा येथील विजय स्तंभाच्या परिसरात मटका, अंदर बहार, सोरट, गिर्दी धंदा, राजरोसपणे चालू असून लोणीकंद पोलिसांचे याकडे दुर्लक्ष आहे, शिवाय या विरोधात तक्रार घेतली जात नाही, संबंधित धंदे कायमचे बंद व्हावेत यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे वतीने पोलीस आयुक्तालय पुणे, पुणे शहर कार्यालयासमोर आज पासून आमरण उपोषण चालू झाले असून यासंबंधी जिल्हाधिकारी पुणे, पोलीस उपायुक्त, लोणीकंद पोलीस स्टेशन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंडगार्डन, यांना देण्यात आले आहे,
उपोषण आंदोलन वेळी राष्ट्रवादी रिपब्लिक पार्टी चे पुणे जिल्हा अध्यक्ष सीमाताई पांचाळ, अनिता जोगदंड पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष, राष्ट्रवादी पार्टीचे बाळासाहेब जाधव भोसरी विधानसभा अध्यक्ष, राष्ट्रवादी पार्टीच्या छाया शिंदे उपाध्यक्ष माऊली ज्ञानेश्वर बोराटे, राष्ट्रवादी रिपब्लिक पार्टीचे माजी शहराध्यक्ष व राष्ट्रवादी रिपब्लिक पार्टीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष कॉम्रेड लक्ष्मण पांचाळ, पॅंथर युवा मोर्चा रामभाऊ ठोके राष्ट्रीय अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते रेश्मा पाटोळे,तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते,