सुनील भंडारे पाटील
हवेली तालुक्यातील मुळा मुठा नदी तीरावर असणाऱ्या कृषी पम्पा ला वॉटर मिटर लाऊन, गटार गंगा चे पाण्यावर दहापट रक्कम वसूल करण्याच्या पाटबंधारे निर्णयाला विरोध करण्या साठी शेतकऱ्याची बैठक नुकतीच पार पडली. सदर बैठकीत शेतीसाठी स्वच्य धरणातील पाणी द्या, व योग्य पाणीपट्टी घ्या. अन्यथा कुठल्याही शेतकऱ्यांनी या पुढे पाणीपट्टी भरू नये, उलट पक्षि आठरा गावे पाणीपट्टीतून मुक्त करा असा ठराव पारित करण्यात आला.
खडकवासला पाटबंधारे विभागाने शेती सिंचनासाठी मुळा मुठा नदीत पाणी सोडत नसल्याची माहिती लेखी स्वरूपात दिली असताना, पाणीपट्टी भरमसाट मागणी करणे अन्याकारक आहे. पुणे शहरासाठी सन 2020ते 2023या तीन वर्षात 60. 100T. M. C. पाणी जलसंपदा विभागाने देऊन दोनशे अठ्ठावीस कोटी नव्वद लाख, चौसस्ट हजार, नऊशे सव्वीस रू. त्या पोटी पाणीपट्टी घेतली आहे. ज्या पाण्यावर एकदा पाणीपट्टी घेतली तेच पाणी वापरानंतर ड्रेनेज द्वारे नदी पात्रात सोडले त्या गटार गंगेच्या पाण्यावर पुन्हा मीटर लाऊन पैसे घेने या बाबत सर्वानी संताप व्यक्त केला.
दूषित, घाण, केमिकल, मिश्रीत पाणी शेती वापरासाठी घेतल्याने शेती नापीक होऊन हा उद्द्योक धोक्यात आला आहे.
दूषित पाण्यामुळे जलचर प्राणी, वनस्पती नष्ट होऊन, नदी शेजारी असणाऱ्या फॉरेस्ट मधील वन्य प्राणी हरीण, बिबट्या, कोल्हा, लांडगा, तरस, रानडुक्कर, वन गायी, मोर लांडोर, स्तलांतरीत झाले.नदीपात्रातील मासे कासव मृत पावले.
या कामी कृति समितीची स्थापना पुढील लढा देण्यासाठी करण्यात आली, अध्यक्ष बापूसाहेब पठारे प्रथम वडगाव शेरी मतदार संघ आमदार,उपाध्यक्ष पांडुरंग आप्पा काळे संचालक यशवंत सह सा का , दीपक कु. गावडे मा. सरपंच,कार्याद्यक्ष विकास दा. उंद्रे, संचालक महानगर बँक, श्रीहरी दादा कोतवाल मा. संचालक यशवंत,
सचिव अंकुश कोतवाल मा. सरपंच,
खजिनदार .कुंडलिक थोरात मा. सरपंच
सल्लागार :मा. दिलीप अण्णा घुले मा. सदस्य जि. प. दादा गोते सरपंच,
संजय भोरडे सरपंच
चौसस्ट हजार, नऊशे सव्वीस रु. पाणीपट्टी घेतली असून. पुणे शहराचे वापरलेले ड्रेनेज चे घाण पाणी नदीत सोडून दिल्यावर. त्याच गटार गंगेचे पाण्याला, पुनः वॉटर मिटर लाऊन दहा पट पाणीपट्टी आकारणे हा शेतकऱ्यावर मोठा अन्याय आहे.
अशा पद्धतीने पाणी पट्टी आकारणी केल्यास पाटबंधारे विभाग मांजरी पासून हिंगणगाव पर्यंत आठरा गावाकडून घाण, दूषित , केमिकल युक्त पाण्यावर सांडपाण्यावर पन्नास कोटी पेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्याच्या खिस्यातून काढुन घेत असल्याचे दिसून येते. घाण , दुर्गंधी दूषित, पाण्यामुळे नदी तील जलचर प्राणी मासे, कासव मृत पावले, जलचर वनस्पस्ती नष्ट झाल्या. शेती नापीक होऊन हा उद्दोग धोक्यात आला. नदीकडच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. नदी किनारी फारेस्ट मधील वन्य प्राणी स्तलांतरित झाले. अशा परिस्तितीत होणाऱ्या अन्यायाला लढा देण्यासाठी कृति समितीची स्थापना करण्यात आली
अध्यक्ष बापूसाहेब पठारे , प्रथमआमदार वडगाव शेरी म. स.
उपाध्यक्ष. पांडुरंग आप्पा काळे, संचालक यशवंत. दीपक कु. गावडे सरपंच, कार्याध्यक्ष विकास उंद्रे, संचालक महानगर बँक,श्रीहरी दादा कोतवाल, संचालक यशवंत सचिव अंकुश कोतवाल, सरपंच
खजिनदार कुंडलिक थोरात, सरपंच
संदीप जगंताप, सरपंच सल्लागार दिलीप अण्णा घुले. जि. प. स. दादा गोते, सरपंच संजय भोरडे.कार्यकारणी सदस्य गणेश रिकामे, विद्याधर गावडे, दत्तात्रय उंद्रे राजेंद्र चौधरी, श्रीहरी दादा कोतवाल, संचालक यशवंत सचिव अंकुश कोतवाल सरपंच, खजिनदार कुंडलीक थोरात, सरपंच संदीप जगताप, सरपंच सल्लागार दिलीपअण्णा घुले , जि. प. स. मा. संजय भोरडे, सरपंच कार्यकारणी सदस्य :गणेश रिकामे, विद्याधर गावडे, दत्ताञय उंद्रे, राजेंद्र चौधरी, नाना बांगर, विजय आबा पायगुडे,कुशाबा गावडे ,बापू भोर,व मोठ्या संख्येने यावेळी शेतकरी उपस्थित होते,