सुनील भंडारे पाटील
कोरेगाव भीमा (तालुका शिरूर) येथील ऐतिहासिक विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम 1 जानेवारी 2024 या पार्श्वभूमीवर शासकीय अधिकाऱ्यांकडून वढू बुद्रुक, कोरेगाव भीमा, सणसवाडी आणि शिक्रापूर गावांमधील परिसराची पाहणी करण्यात आली,
दरवर्षी एक जानेवारीला लाखोच्या संख्येने देशाच्या कानाकोपऱ्यातून भीम अनुयायी ऐतिहासिक विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी येत असतात, या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी शासकीय सर्व यंत्रणा सर्व ताकदीनिशी उतरतात, हा कार्यक्रम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून शासकीय अधिकाऱ्यांच्या वतीने, या भागामध्ये पाहणी करण्यात आली, यावेळी शिरूर उपविभागीय अधिकारी सूळ ,शिरूर पोलीस उपविभागीय अधिकारी यशवंत गवारी , शिरूर चे तहसीलदार बाळासाहेब मस्के , शिक्रापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार , कोरेगाव भीमाचे मंडळ अधिकारी विकास फुके, वढु बुद्रुक चे पोलीस पाटील जयसिंग भंडारे , ग्रामसेवक शंकर भाकरे , तलाठी रमेश घोडे व इतर अधिकारी,कर्मचारी यांच्या समवेत यावेळी उपस्थित होतो.