सुनील भंडारे पाटील
सोनोरी (तालुका पुरंदर) येथील तलाठी व खाजगी इसम पाच हजार रुपये लाज घेताना लाचलुपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी रंगे हात पकडून त्यांना ताब्यात घेतले आहे,1) निलेश सुभाष गद्रे,वय 42 वर्ष, पद तलाठी वर्ग 3, सजा सोनोरी पुरंदर जिल्हा पुणे, 2) आदित्य मधुकर कुंभारकर, वय 21 वर्ष, रा, वजपुरी तालुका पुरंदर, जिल्हा पुणे खाजगी इसम अशी या आरोपींची नावे आहेत,
सासवड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन 1988 चे कलम 7,7अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका शेतकरी तक्रारदाराच्या आजोबांनी तक्रारदाराला 39 गुंठे बक्षीस पत्राने दिली होती, सदर बक्षीस पत्राची नोंद सातबारा उताऱ्यावर करण्यासाठी तक्रारदाराने लेखी स्वरूपात अर्ज तलाठ्याला दिला होता, सदर नोंदीसाठी तलाठी गद्रे याने तक्रारदाराकडे 5,000 रुपये मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांना प्राप्त झाली होती,
सदर तक्रारीही पडताळणी केली असता आरोपी लोकसेवक तलाठी निलेश गद्रे, तसेच खाजगी इसम आदित्य कुंभारकर या दोघांनी 5000 रुपयाची मागणी करून ही रक्कम पंचा समक्ष स्वीकारली, त्यांना लाच स्वीकारताना रंगे हात पकडल्याने ताब्यात घेण्यात आले, त्यांच्याविरुद्ध सासवड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांचे पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर करीत आहेत,
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त/ पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर शितल जानवे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पथकाने केली,