आळंदी प्रतिनिधि आरीफ भाई शेख
आळंदी/ माराठा आरक्षण अक्षरशः वादळ आल्या प्रमाणे जोर धरत आहे.सकल मराठा समाज आता माघार घ्यायला तयार नाही. आमदार खासदारांचे राजीनामे यासाठी येतं आहेत,
आळंदीतील मराठा योद्धा श्रीकांत काकडे यांची भेट घेत आज आळंदीतील माजी नगरसेवक आणि अजितदादा पवार गटाचे. आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांचे समर्थक श्री प्रकाश कुऱ्हाडे पाटील यानी मराठा आरक्षणाचे समर्थन करत आपल्या पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला,
प्रकाश कुऱ्हाडे पाटील यांचे मराठा आरक्षण मिळावे यासाठी साखळी उपोषणाला पाठिंबा देत. याबाबत पुढील काळात मराठा समाजाला आरक्षण मिळे पर्यंत सक्रिय आंदोलनं सहभाग दर्शवणार असलेचे त्यांनीं भरारी न्यूज प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले आहे,