सुनील भंडारे पाटील
संपूर्ण देशभर गाजत असलेला मुद्दा मराठा आरक्षण या महत्त्वाच्या मराठा समाजाच्या मागणीसाठीची धग आता संपूर्ण राज्यभरात शहरे तसेच खेडोपाडी पोहोचली असून पेरणेगाव व पेरणे फाटा येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गावात व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला,
वास्तविकता आजतोवर राज्य शासनाने या मुद्द्यावर तोडगा काढणे गरजेचे होते, परंतु निर्णय घ्यायला विलंब लागत असल्याने मराठा समाजाची नाराजी वाढत चालली आहे, आंदोलन अजून तीव्र होऊ लागले आहे, जरांगे पाटील यांची मागणी रास्त असून राज्य शासन वेळ काढू पणा करत आहे, आमच्या हक्काचे आरक्षण आम्हाला द्या अशा स्वरूपाचे मागण्या करत पेरणे मध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला,
पेरणे गाव तसेच पुणे नगर महामार्गावर महत्त्वाची बाजारपेठ असणाऱ्या तसेच मोठी रहदारी असणाऱ्या पेरणे फाटा या ठिकाणी लहान मोठे व्यापारी, व्यावसायिक यांनी आपली दुकाने त्याचप्रमाणे इतर कार्यालय बंद ठेवून कडकडीत असा बंद पाळण्यात आला, मराठा समाजाला लवकरात लवकर राज्य सरकारने आरक्षण द्यावे अशी मागणी सर्वनुमते करण्यात आली,